Home /News /crime /

हत्येसाठी गुगल मॅपची घेतली मदत; लग्नाच्या अवघ्या 15 दिवसात तरुणीने पतीला संपवलं

हत्येसाठी गुगल मॅपची घेतली मदत; लग्नाच्या अवघ्या 15 दिवसात तरुणीने पतीला संपवलं

नवविवाहिता एक दिवसापूर्वीच सासरी आली होती.

    भोपाळ, 10 जुलै : मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातून (Vidisha district of Madhya Pradesh) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे लग्नाच्या अवघ्या 15 दिवसात नवविवाहितीने पतीची हत्या केली आहे. यासाठी तिने चार वर्षांपासून प्रेमसंबंध (Love Affair) असलेल्या प्रियकराची मदत घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, विदिशातील लाटेरी तहसीलच्या मलिया खेडी गावात ही घटना घडली. पत्नी कृष्णा बाईने पतीची हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. तिने प्रियकर शुभम याच्या मदतीने पतीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री नवविवाहित जोडपं झोपलं होतं. त्यावेळी पत्नीने डाव साधत पतीला संपवलं. पत्नीने हत्येदरम्यान आपण बेशुद्ध झाल्याचा पोलिसांना जबाब दिला होता. मात्र पोलिसांना सुरुवातीपासूनच पत्नीवर संशय होता. पत्नीने पतीचे दोन्ही हात धरले आणि प्रियकराने पतीवर कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केली. (Google Maps help to kill; Within just 15 days of the marriage girl killed her husband) हे ही वाचा-लग्नासाठी महाराष्ट्रातल्या मुलीची केली निवड; मात्र सप्तपदीपूर्वीच नवरी फरार लग्नाच्या 15 दिवसांनंतर नवविवाहित महिलेने पतीची निघृणपणे हत्या केली. महिला एक दिवसापूर्वीच सासराच्या घरी आली होती. गेल्या चार वर्षांपासून पत्नीचे शुभम नावाच्या मुलावर प्रेम होते. आणि याच त्याची तिने पतीचा जीव घेतला. पत्नीने हत्येचा बनाव रचला आणि प्रियकराला फोन करून बोलावून घेतलं. यानंतर प्रियकर बाईक घेऊन आला. त्याने बाईकलाच कुऱ्हाड बांधली होती. गुगल मॅपच्या मदतीने प्रियकराने प्रेयसीचं घर गाठलं होतं. त्यानंतर दोघांनी मिळून ही हत्या घडवून आणली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Marriage, Murder

    पुढील बातम्या