• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • Akola News : महिला दिनाच्या दिवशी शिक्षकाने केला सहशिक्षिकेचा विनयभंग!

Akola News : महिला दिनाच्या दिवशी शिक्षकाने केला सहशिक्षिकेचा विनयभंग!

गेल्या वर्षभरापासून आरोपी शिक्षक तक्रारदार शिक्षिकेशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. अश्लील नजरेने पाहायचा...

  • Share this:
अकोला, 09 मार्च : महिलांचा सन्मान आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वत्र जागतिक महिला दिन (International Women's Day) साजरा होत असताना अकोल्यातील (Akola) अकोट शहरात एका शिक्षकाने महिला शिक्षिकेचा (Teacher) विनयभंग केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी 8मार्च रोजी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कर्तृत्वान महिला आणि इतर क्षेत्रातीलमहिलांचा सन्मान केला जातो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र काही पुरुषांना याचं भान राहत नाही. असाच प्रकार अकोल्यातील अकोट पंचायत समिती अंतर्गत सर्वशिक्षा अभियान शिक्षण  (गटसाधन केंद्र) कार्यालयात आठ मार्चला पाहायला मिळाला. एका शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षिकेचा विनयभंग केला. Nagpur News:खुर्चीवर बसवले आणि हात पाय बांधून 65 वर्षीय व्यक्तीची क्रुरपणे हत्या शिक्षिकेने अकोट पोलिसात यासंदर्भात तक्रार दाखल केली. आरोपी व फिर्यादी दोघेही अकोट सर्वशिक्षा अभियान शिक्षण विभाग येथे कार्यरत आहेत. गेल्या वर्षभरापासून आरोपी शिक्षक तक्रारदार शिक्षिकेशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. अश्लील नजरेने पाहायचा, नेहमीच धक्का लावून जायचा, मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न करायचा. अखेर कंटाळून पीडित शिक्षिकेने अकोट शहर पोलिसात शिक्षका विरुद्ध आठ मार्चला तक्रार दिली. Asian Paints Where The Heart Is मध्ये दिसणार स्मृची मंधानाचं घर या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध भादंविचे कलम 354(अ), 354(ड)  नुसार गुन्हा दाखल करून, त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पाचपोर करत आहेत. शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी समित्या गठीत केल्या आहेत. मात्र, तरीही नोकरदार महिला सुरक्षित नसल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात, आपल्या परिवारासाठी घराबाहेर पडून जिवाचं रान करणाऱ्या महिलांची सुरक्षा महत्वाची आता महत्वाची ठरत आहे. दिवसेंदिवस असे प्रकार घडत असल्याने,अश्या नराधमांना कायद्याची भीती उरली नाही.  शासनाने महिला सुरक्षे संदसर्भात कठोर पावले उचलून अश्या आंबट शौकिनांना लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
Published by:sachin Salve
First published: