• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ‘Asian Paints Where The Heart Is’ सीझन 4 मध्ये महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटर स्मृती मंधानाच्या घराची झलक

‘Asian Paints Where The Heart Is’ सीझन 4 मध्ये महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटर स्मृती मंधानाच्या घराची झलक

smrithi mandhawa

smrithi mandhawa

‘Asian Paints Where The Heart Is’ सीझन 4 मध्ये महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटर स्मृती मंधानाचं घर प्रेक्षकांना पहायला मिळालं. तिचं घर हे एखाद्या शांत पवेलियन सारखं आहे.

 • Share this:
  मार्च 9, 2021: आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चमकता तारा असलेली स्मृती मानधना दक्षिण महाराष्ट्रात वसलेले सांगली हे विलक्षण शहर हे आपले घर असल्याचे सांगते. महिला दिनी ‘Asian Paints Where The Heart Is’चे चौथे पर्व आपल्याला घेऊन जाते स्मृतीच्या घरी, जिथे मैदानाच्या झगमगाटाच्या अगदी उलट अगदी शांततापूर्ण निवारा आहे. हे घर म्हणजे एक सामायिक अशी राहण्याची जागा आहे जिथे हे कुटुंब एकत्र वेळ व्यतीत करते, पत्त्यांचे डाव खेळते आणि तेथे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी एक प्रोजेक्टरही आहे. स्मृतीने अतुल्य धैर्य आणि निश्चयाने अगदी लहान वयापासून व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची मनीषा बाळगणाऱ्या महिलांसाठी मार्ग सुकर केला आहे. ती तिच्या शहरामध्ये प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले सुयोग्य असे सिमेंटचे विकेट उपलब्ध नव्हती तेव्हाचे व्यक्तिगत किस्से सांगते, आणि आपल्या पालाकानाच्या पाठींबा व प्रोत्साहनामुळे तिने 16 वर्षांची असताना आपल्या कमाईतील बहुतांश भाग खर्च करून स्वतःसाठी व आपला सराव करू इच्छिणाऱ्या इतरांसाठी कशी विकेट बनवली हे कथन करते. यामध्ये स्मृती व तिची कारकीर्द यांवर स्पष्टपणे लक्ष्य आहे: एक टीव्ही रूम आता घरगुती जिम बनली आहे. एक टेक्स्चर्ड भिंत साफ करून शूट्ससाठी एक साधासा स्टुडीओ बनवलेला आहे आणि दिवाणखान्याची एक भिंत पूर्णपणे बक्षिसांनी भरून गेली आहे. तिच्या यशाविषयीचा तिच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर ओसंडणारा अभिमान आणि तिच्या कारकीर्दीविषयी असलेल्या तिच्या दृष्टीकोनांमध्ये ते कसे एकवटलेले आहेत हे पाहणे अत्यंत सुंदर आहे. स्मृती मानधनाचे घर म्हणजे तिच्या शिस्त आणि कौशल्याचेच नव्हे तर तिच्या व तिच्या कुटुंबियांमधील स्नेह व जिव्हाळ्याचे खरेखुरे प्रतीक आहे. अत्यंत कुशल क्रिकेटपटू असलेल्या स्मृतीने घडवलेल्या तिच्या घराच्या अद्वितीय सफरीचा आनंद घ्या, बहुप्रतिक्षीत, प्रशंसनीय आणि अभिनव अशा, चौथे पर्व घेऊन आलेल्या Asian Paints Where The Heart Is च्या दुसऱ्या भागामध्ये.   Where The Heart Is पर्व 4, भाग 2: ‘Asian Paints Where The Heart Is’च्या चौथ्या पर्वाविषयी ‘Asian Paints Where The Heart Is’चे चौथे पर्व प्रेक्षकांना सात अत्यंत लोकप्रिय अशा नामवंतांच्या सात अद्वितीय सुंदर घरांची आगळी वेगळी सफर घडवणार आहे. यावर्षी शंकर महादेवन, अनिता डोंगरे, स्मृती मानधना, तमन्ना भाटीया, राजकुमार राव, प्रतीक कुहाड आणि भावंडे, शक्ती व मुक्ती मोहन यांसारखे नामवंत आपल्याला त्यांचे घर दाखवणार आहेत व त्यांच्या काही आठवणी सांगून प्रेक्षकांशी भावनिक नाते जोडणार आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये 250 दशलक्ष पेक्षाही अधिक व्ह्यूज मिळवून Asian Paints ने दाखवलेल्या 22 घरे आणि 27 नामवंतांच्या माध्यमातून या कार्यक्रम आणि प्रेक्षकांमध्ये एक मजबूत धागा जोडला आहे. चौथे पर्व या कार्यक्रमामध्ये काही नवीन घटक आणेल. हे पर्व प्रेक्षकांना नामवंत आणि त्यांच्या घरांच्या समृद्ध मांडणीच्या कथांशी परिचित करेल. स्पेस-फर्स्ट अप्रोचच्या मदतीने, प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीचे घर अधिक बारकाईने पहायला मिळेल: आत्मविश्वास प्रतिबिंबित करणारा सजावटीतील एखादा धाडसी बदल असो की किरकोळ, नवीन पर्वाचे उद्दीष्ट नामवंतांच्या स्वतःच्या, त्यांच्याशी घट्टपणे जुळलेल्या आणि त्यांचे व्यक्तिमत्व प्रतिबिओम्बित करणाऱ्या वास्तव, राहण्याजोग्या, स्नेहपूर्ण जागा टिपण्याचे आहे. तसेच, टाळेबंदीदरम्यानचे  नामवंतांचे अनुभव आणि क्षण, त्यांच्या कुटुंब, एकत्रितपणा यांविषयीच्या संकल्पना, आणि या नवीन जगात घराचे त्यांना वाटणारे महत्त्वही प्रेक्षकांना जाणून घेता येईल. हा कार्यक्रम नातेसंबंधांच्या सौंदर्यावर आणि घराबद्दलचा जिव्हाळा त्यांना कसा पुष्टी देतो हेही स्पष्ट करतो. एखाद्या व्यक्तिमत्त्वाकडून एखादे घर सजवण्यासाठी काही उत्कट कल्पना आणि टिप्सदेखील मिळू शकतात. सीझन 4 त्यांच्या कट्टर चाहत्यांसाठी एक नवीन आणि रोमांचक घटक आणत आहे ज्यामध्ये प्रत्येक भागामध्ये एका भाग्यवान प्रेक्षकाला त्यातील सेलिब्रिटीशी निगडीत एक विशेष भेटवस्तू मिळेल.
  Published by:news18 desk
  First published: