मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Nagpur News : खुर्चीवर बसवले आणि हात पाय बांधून 65 वर्षीय निर्घृण व्यक्तीची हत्या, नागपूर हादरलं

Nagpur News : खुर्चीवर बसवले आणि हात पाय बांधून 65 वर्षीय निर्घृण व्यक्तीची हत्या, नागपूर हादरलं

 लक्ष्मण मलिक हे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते, त्यांची पाच लग्न झाल्याची माहिती पुढे आली आहे.

लक्ष्मण मलिक हे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते, त्यांची पाच लग्न झाल्याची माहिती पुढे आली आहे.

लक्ष्मण मलिक हे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते, त्यांची पाच लग्न झाल्याची माहिती पुढे आली आहे.

तुषार कोहळे, प्रतिनिधी

नागपूर, 09 मार्च : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर (Nagpur) शहरात गुन्हेगारींच्या घटनाचे सत्र सुरूच आहे. शहरातील  गणेशपेठ (Ganesh Peth Police station Nagpur) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 65 वर्षीय व्यक्तीची अत्यंत क्रुरपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. खुर्चीवर पाठीमागे हात बांधून गळा चिरण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाार, लक्ष्मण मलिक (वय 65) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानक भागातील रजत संकुल या इमारतीच्या प्लॅट क्रमांक 103 मध्ये मलिक हे मित्राच्या फ्लॅटमध्ये राहत होते. मलिक यांची हत्या इतकी क्रूरपणे करण्यात आली की, आधी त्यांना खुर्चीवर बसवून हातपाय बांधण्यात आले, त्यानंतर जबर मारहाण करत त्यांचा गळा कापून हत्या करण्यात आली.

Asian Paints Where The Heart Is मध्ये दिसणार स्मृची मंधानाचं घर

पोलिसांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीचा शोध सुरू आहे.  लक्ष्मण मलिक हे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते, त्यांची पाच लग्न झाल्याची माहिती पुढे आली आहे. सोबतच ते आर्थिक संकटात असल्याचे तपासात पुढे आले असल्याने पोलीस या सर्व बाजूचा विचार करून आरोपीचा शोध घेत आहे.

गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकासमोर रजत संकुल ही बहुमजली इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर एका सदनिकेत हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीचे ऑफिस आहे. येथे लक्ष्मण मलिक सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते.  मुळचे जरीपटका येथील रहिवासी असून ऑफिस बंद झाल्यानंतर ते तेथेच राहायचे. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ऑफिसचे कर्मचारी निघून गेल्यानंतर मलिक तेथे थांबले होते.

5G सारखा होईल तुमच्या 4G इंटरनेटचा स्पीड; फोनमध्ये करा हे बदल

आज सकाळी 10.15च्या सुमारास ऑफिस उघडायला कर्मचारी आले तेव्हा मलिक रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे दिसले. त्याचे हात मागे बांधून होते आणि गळ्यावर कैची किंवा पेचकस सारख्या शस्त्राचे वार केल्याच्या खुणा होत्या. खाली रक्ताचे थारोळे साचले होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रजत संकुलन ही अत्यंत रहदारीची इमारत आहे. रात्री या इमारतीत कोण कोण आले याचा पोलीस शोध घेत आहे. काही सीसीटीव्हीचा तपास पोलीस करत आहे. मलिक यांच्यावर कोणावर कर्ज होते, त्यासाठी कोण कोण तगादा लावत होते याचा पण तपास पोलीस करत आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Mumbai, Murder, Nagpur, Shocking news