**पनवेल, 07 एप्रिल :**घरगुती वादातून झालेल्या मारहाणीत 3 वर्षीय मुलीचा नाहक बळी गेल्याची संतापजनक घटना पनवेलमध्ये (Panvel) घडली आहे. रॅपिड ऍक्शन फोर्सच्या (Rapid Action Force) जवानाने घरगुती भांडणातून पत्नी व मुलीला केलेल्या मारहाणीत तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जवानाने 3 वर्षांच्या चिमुरडीला भिंतीवर आपटले होते, यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा येथील तलावाजवळ असणाऱ्या डेम्ब्रिजमध्ये एका तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. खारघर पोलिसांनी मुलीच्या फोटोवरुन तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता सदर मुलगी पापडी पाडा गावातील रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानाची असल्याचे समजले. आरोपी रॅपिड ऍक्शन फोर्सचा जवान असून त्याचे नाव परशुराम तिपन्ना असे आहे.( सूर्यावर निर्माण झाली 2 लाख KM लांबीची ‘आगीची दरी’; पृथ्वीवर होतोय असा परिणाम ) घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस जवानाच्या घरी गेले असता जवानाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. घरगुती भांडणा दरम्यान मुलीला भीतीवर आपटल्याने तिच्या डोक्यावर जबर मार लागून तिचा जागीच मृत्यू झाला होता. ( IPL 2022 : अजिंक्यनं कॅच सोडताच श्रेयस अय्यरचा राग अनावर, पाहा VIDEO ) त्यामुळे पहाटेच्या सुमारास मुलीचा मृतदेह तळोजा तलावाशेजारी असणाऱ्या डेब्रिजच्या भरावामध्ये पुरण्याचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपी परशुराम तिपन्नावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खारघर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.