जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सूर्यावर निर्माण झाली 20 हजार KM खोल अन् 2 लाख KM लांबीची ‘आगीची दरी’; पृथ्वीवर होतोय असा परिणाम

सूर्यावर निर्माण झाली 20 हजार KM खोल अन् 2 लाख KM लांबीची ‘आगीची दरी’; पृथ्वीवर होतोय असा परिणाम

सूर्यावर निर्माण झाली 20 हजार KM खोल अन् 2 लाख KM लांबीची ‘आगीची दरी’; पृथ्वीवर होतोय असा परिणाम

सूर्याच्या पोटात अनेक मोठी रहस्यं दडलेली आहेत असं म्हटलं जातं. 3 एप्रिल 2022 रोजी त्यावर प्लाझ्माचं एक फिलामेंट निर्माण झालं होतं. हे फिलामेंट प्रचंड मोठं, खोल आणि शक्तिशाली होतं

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 07 एप्रिल : आपली ग्रहमाला अत्यंत गूढ आहे. किती तरी रहस्यं या ग्रहांच्या पोटात दडलेली आहेत. सूर्यही याला अपवाद नाही. सूर्याच्या पोटात अनेक मोठी रहस्यं दडलेली आहेत असं म्हटलं जातं. 3 एप्रिल 2022 रोजी त्यावर प्लाझ्माचं एक फिलामेंट निर्माण झालं होतं. हे फिलामेंट प्रचंड मोठं, खोल आणि शक्तिशाली होतं. या फिलामेंटमधून चुंबकीय शक्तीयुक्त सौर हवा बाहेर फेकली जात आहे. त्यामुळे पृथ्वीच्या ध्रुवांवर सतत ऑरोरा (Auroras) म्हणजेच उजेड निर्माण होत आहे. विशेष म्हणजे हे फिलामेंट 20 हजार किलोमीटर खोल आणि 2 लाख किलोमीटर लांब इतकं प्रचंड होतं. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. वैज्ञानिकांनी याला ‘आगीची दरी’ (Canyon Of Fire) असं नाव दिलं आहे. इंग्लंडच्या हवामान खात्यानंही या घटनेला दुजोरा दिला होता. सूर्याच्या दक्षिण-मध्य भागात दोन मोठे फिलामेंट्स निर्माण होताना दिसले आहेत, असं इंग्लंडच्या हवामान खात्यानं म्हटलं आहे. अंतराळातल्या अल्ट्राव्हायोलेट भागात भ्रमण करणारे सॅटेलाइट्स आणि जमिनीवरच्या टेलिस्कोप्समधूनही या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा फोटो घेण्यात आला आहे. हा स्पेक्ट्रम फिलामेंटमुळेच तयार झाला होता. यावरूनच याच्या स्फोटाचा अंदाज लावला जाऊ शकतो.

    काचेचा ग्लास उलटा करून ठेवणं ठरू शकतं धोकादायक? टिकटॉक युजरने सांगितलं किचन हॅक

    सूर्यावर हे पहिलं फिलामेंट 3 एप्रिल रोजी, तर दुसरं फिलामेंट 4 एप्रिल 2022 रोजी तयार झाल्याची माहिती आहे. त्या दोन्हींच्या विस्फोटानंतर कोरोनल मास इजेक्शन (Coronal Mass Ejections- CMEs) झालं होतं. यामुळे चार्ज झालेल्या (आवेषित) प्लाझ्माच्या लाटा सूर्याच्या बाहेरील वायुमंडळामधून निघून पृथ्वीच्या दिशेने आल्या होत्या. जेव्हा CME ची पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी टक्कर होते तेव्हा जिओमॅग्नेटिक (Geomagnetic) वादळ निर्माण होतं. जिओमॅग्नेटिक वादळ जास्त शक्तिशाली असतं, तेव्हा ते सॅटेलाइट लिंक्सनाही प्रभावित करतं. पृथ्वीच्या कक्षेत फिरणारी यंत्रं आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचंही यामुळे नुकसान होतं. पृथ्वीवरच्या वीजप्रवाहावरही याचा परिणाम होऊ शकतो. हे वादळ वायुमंडळावर आलं तर त्यामुळे नॉर्दर्न लाइट्स तयार होतात. सध्या सूर्यावरच्या हालचाली वाढल्या आहेत. 2019 पर्यंत सोलर मिनिमम स्थिती कायम होती. 11 वर्षांपर्यंत तो याच स्थितीत होता. या 11 वर्षांमध्ये सूर्यावर कोणत्याही प्रकारचे स्फोट झाले नाहीत. हे स्फोट कमी झाले; पण 2019 च्या डिसेंबर महिन्यानंतर मात्र सोलर मॅक्झिमम स्थिती आहे. आता ती जास्त सक्रिय असेल. 2025 सालात खूप जास्त सौर वादळं निर्माण होतील असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक विस्फोटही होतील असं त्यांचं म्हणणं आहे.

    उगीच नाही म्हणत डायरी लिहिली पाहिजे; आजच्या ‘वेळ’ नसलेल्या युगात अशी ठरते उपयोगी

     3 आणि 4 एप्रिलला निघालेल्या CME मुळे पृथ्वीवर 7 आणि 8 एप्रिल रोजी जिओमॅग्नेटिक वादळाचा परिणाम बघायला मिळू शकतो. हे वादळ G1 आणि G2 स्तराचं असू शकतं. अर्थात 4 एप्रिल रोजी निर्माण झालेल्या वादळाचा पृथ्वीवर काही परिणाम होईल का, याबाबत अजून नक्की नाही; पण ध्रुवांवर वायुमंडळाचा स्तर थोडा पातळ म्हणजेच कमी जाड असतो. त्यामुळे दोन्ही ध्रुवांवर इंद्रधुनष्याच्या रंगांच्या प्रकाशाचं दृश्य पाहायला मिळू शकतं.

    पृथ्वीचं जिओमॅग्नेटिक वायुमंडळ पुढच्या काही दिवसांत शांत असेल असं ब्रिटनच्या हवामान खात्याचं म्हणणं आहे. सध्या पृथ्वी अशा स्थितीत आहे, की सौरवादळ आलं की पृथ्वीची स्थिती सूर्यासमोर असते. त्यामुळे सूर्यावर ठिकठिकाणी होणाऱ्या स्फोटांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: fire
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात