जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 5 वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या; भयंकर अवस्थेत आढळले मृतदेह, नेमकं काय घडलं?

5 वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या; भयंकर अवस्थेत आढळले मृतदेह, नेमकं काय घडलं?

5 वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या; भयंकर अवस्थेत आढळले मृतदेह, नेमकं काय घडलं?

प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या (brutal murder) झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. येथील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या (nawabganj police station) हद्दीतील खगलपूर गावात काल रात्री ही घटना घडली.

  • -MIN READ
  • Last Updated :

प्रयागराज (उत्तरप्रदेश), 16 एप्रिल : प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या (brutal murder) झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. येथील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या (nawabganj police station) हद्दीतील खगलपूर गावात काल रात्री ही घटना घडली. जिथे 42 वर्षीय राहुल तिवारी, त्यांची पत्नी प्रीती (38) आणि तीन मुलींची हत्या करण्यात आली होती. मुलींचे वय 12 वर्षे, 7 वर्षे आणि 5 वर्षे सांगितले जात आहे. तर हत्येचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही.

काय आहे संपूर्ण घटना?

कौशांबीचे कुटुंब नवाबगंजच्या खगलपूर गावात भाड्याने राहत होते. ही घटना रात्री उशिरा घडली. सकाळी घराचा दरवाजा बंद होता. बराच वेळ घरातून काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा ठोठावला, असे असतानाही घराचा दरवाजा न उघडल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा -  धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांवर Acid Attack; कारण समोर

हत्येची माहिती मिळताच नवाबगंज पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले.  पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर ते चक्रावून गेले. येथे राहुल तिवारी यांचा मृतदेह फासावर लटकलेला होता, तर त्यांची पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह बेडवर पडले होते. या चौघांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्याच्या रक्ताने पलंग पूर्ण लाल झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्याचबरोबर फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री योगींनी शोक व्यक्त केला -

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून निष्पक्षपणे तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात