दरभंगा (बिहार) : परस्पर वादातून दुसऱ्या बाजूने अॅसिडने हल्ला (Acid Attack) केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या दरभंगा (Darbhanga) जिल्ह्यातून समोर आली आहे. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील ४ जण गंभीररित्या भाजले. सर्व जखमींवर दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (DMCH) उपचार सुरू आहेत. एकाच वेळी 4 जणांवर अॅसिड हल्ला झाल्याच्या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांसह पोलिसही चक्रावून गेले. त्याचवेळी रुग्णालयाच्या अधीक्षकांनी स्वत: घटनास्थळी पोहोचून अॅसिड हल्ल्यातील चार जणांना एकत्र रुग्णालयात पोहोचवून परिस्थितीचा आढावा घेतला. हल्ल्यातील पीडितेच्या डोळ्यात अॅसिड टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एपीएम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसिंगपूर येथे जमिनीच्या वादातून दोन बाजू समोरासमोर आल्या. दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. यादरम्यान एका बाजूने दुसऱ्या बाजूच्या लोकांवर अॅसिड फेकले. या हल्ल्यात 4 जण जखमी झाले आहेत. घाईघाईत अॅसिड हल्ल्यात भाजलेल्या सर्वांना स्थानिक लोकांनी उपचारासाठी डीएमसीएचमध्ये आणले. जखमींमध्ये शिवसिंगपूर गावातील बजरंगी साह (45), अशोक कुमार भगत (59), विजय कुमार (48) आणि विकास कुमार (40, रा. श्रीपूरबहादूरपूर गाव) यांचा समावेश आहे. जखमींपैकी बजरंगी साह आणि विकास कुमार यांची प्रकृती चिंताजनक आहे. इतर जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
हेही वाचा - पतीने चुकून पत्नीच्या विक्रीची दिली ऑनलाईन जाहिरात; खरेदीदारांनी केली हद्द पार, पाहून खुश झाली महिला
बजरंगी साह यांचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. दुकानात ठेवलेले अॅसिड हिसकावून घेताना अॅसिडने जखमी झाल्याचे बजरंगी साह यांनी सांगितले. एपीएमचे एसएचओ शैलेश कुमार यांनी सांगितले की, जमिनीच्या वादावरून दोन्ही पक्षांमध्ये मारहाणीची घटना घडली आहे. यामध्ये दोन्ही बाजूचे लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेबाबत आजपर्यंत दोन्ही बाजूंकडून कोणताही अर्ज आलेला नाही, असे ते म्हणाले.
त्याचवेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डीएमसीएचच्या अधीक्षकांनी स्वत: जखमींचा आढावा घेतला. अॅसिडमुळे जखमी झालेल्या ४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी एकाच्या डोळ्यात अॅसिड पडले आहे. सर्वांवर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी, दुसऱ्या बाजूचे लोकही जखमी झाले आहेत, त्यांच्यावर (DMCH) मध्येच उपचार सुरू आहेत. दोन्ही बाजूचे 6 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.