नांदेड 23 नोव्हेंबर : हत्येच्या आणि गुन्हेगारीच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. यातील अनेक घटनांमध्ये हत्येचं कारण अतिशय क्षुल्लक असतं. तर, काही घटना ऐकूनच आपला थरकाप उडतो. आता हत्येची आणखी एक धक्कादायक घटना नांदेडमधून समोर आली आहे. यात एका आंतरजातीय विवाहितेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 8 ते 10 जणांच्या टोळक्याने युवकाचा खून केला आहे. घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला पण निर्णय चुकला; प्रेमानेच घेतला 19 वर्षीय तरुणीचा जीव 8 ते 10 जणांच्या टोळक्याने 30 वर्षीय युवकाची हत्या केली आहे. नांदेडमध्ये ही धक्कादायक घटना घडली. नुरी चौक परिसरातील वसंता नगर भागात घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत स्वप्नील नागेश्वर याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. स्वप्नील याचंही वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं. मात्र, त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा संशय आरोपींना होता. स्वप्नील आणि ती विवाहिता नांदेड शहरातील एका हॉटेलमध्ये एकत्र असल्याचं समजल्यानंतर 8 ते 10 तरुणांनी लगेचच याठिकाणी धाव घेतली. यानंतर त्यांना जबरदस्तीने उचलून रिक्षामध्ये टाकलं. आरोपींनी दोघांना गोदावरी नदी घाटाशेजारील आणलं. याठिकाणी आणून त्यांना मारहाण करण्यात आली. 8 ते 10 जण महिलेला धमकावत असल्याचा प्रकार तिथे असलेल्या सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, आक्षेपार्ह स्थितीत दिसली होती पत्नी, सहा महिन्यांनी सत्य समोर या टोळक्याने नंतर स्वप्नीलला लाकडाने आणि रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत स्वप्नीलचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी त्याचा मृतदेह तिथेच सोडून पसार झाले. हत्येची ही संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस सध्या या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. आंतरजातीय विवाहितेसोबत असलेल्या संबंधांमुळे आरोपींनी स्वप्नीलची हत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.