मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, आक्षेपार्ह स्थितीत दिसली होती पत्नी, सहा महिन्यांनी सत्य समोर

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, आक्षेपार्ह स्थितीत दिसली होती पत्नी, सहा महिन्यांनी सत्य समोर

आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर

आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर

रात्री भगेंद्र आपल्या साथीदार दीपला बाहेर सोडून रीमाला भेटण्यासाठी घरात गेला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Rajasthan, India
  • Published by:  Khushalkant Dusane

भरतपूर, 22 नोव्हेंबर : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात 6 महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. बेपत्ता झालेल्या या व्यक्तीची पत्नीने तिच्या प्रियकरासह हत्या केली होती. नंतर मृतदेह गोणीत बांधून कालव्यात फेकून दिला. यानंतर लोकांना हे कळू नये म्हणून पतीला मारल्यानंतर पत्नी 6 महिने मेकअप करून फिरत होती. आता सहा महिन्यांनंतर ही बाब उघडकीस येताच मृतांच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तर पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हे प्रकरण भरतपूरच्या चिकसाणा पोलीस स्टेशन हद्दीतील आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

चिकसाणाचे पोलीस अधिकारी विनोद कुमार यांनी सांगितले की, हत्येचा बळी ठरलेल्या पवनचा सात वर्षांपूर्वी आरोपी रीमासोबत विवाह झाला होता. पाच वर्षांनंतर त्याच्या आयुष्यात वेगळीच घटना घडली. पवनची पत्नी रीमा हिचे तिच्याच शेजारी राहणाऱ्या भेंद्र नावाच्या तरुणावर 2 वर्षांपूर्वी प्रेम झाले आणि दोघेही गुपचूप भेटू लागले. दरम्यान, 29 मे 2022 रोजी रीमाने तिचा प्रियकर भागेंद्र याला फोनवर बोलावले. भगेंद्र त्याच्या मित्रासह रीमाला भेटण्यासाठी गावी पोहोचला.

पवनने पत्नीला प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले -

रात्री भगेंद्र आपल्या साथीदार दीपला बाहेर सोडून रीमाला भेटण्यासाठी घरात गेला. त्याचवेळी पवनला जाग आली. यानंतर त्याने जाऊन पाहिले असता त्याला पत्नी रीमा आणि भगेंद्र हे दोन्ही आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. यानंतर त्याने त्यांच्या संबंधाना विरोध केला. मात्र, विरोध केल्याने भगेंद्र आणि रीमा यांनी पवनचे तोंड दाबले आणि नंतर गळा आवळून खून केला. यानंतर भगेंद्रने त्याच्या मित्र दीपला घरात बोलावले.

त्यांनी पवनचा मृतदेह चादरीत गुंडाळून प्लास्टिकच्या दोरीने बांधला. नंतर त्याला गोणीत भरून घेऊन गेले. घरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर मृतदेह दगडाने बांधून घाण पाण्याच्या कालव्यात फेकून दिला. त्यानंतर भगेंद्र त्याच रात्री मित्रासोबत दिल्लीला परतला. त्याचवेळी, काहीच झालेले नाही असे दाखवण्यासाठी पत्नी पूर्णपणे मेकअप करायची. पवनचा खून झाला त्याच बेडवर ती जेवत असे.

हेही वाचा - स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान ओळख; तरुणीचा मृतदेह 4 दिवस कारमध्ये अन् परफ्यूमचा मारा, भयंकर घटना 

या संपूर्ण प्रकरणाबाबत पवनच्या वडिलांनी 4 जून रोजी चिकसाणा पोलीस ठाण्यात पवन गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला होता. त्याचवेळी या घटनेनंतर भगेंद्र आणि रीमा दोघेही एकमेकांशी बोलत राहिले. ऑक्टोबर महिन्यात भगेंद्र पुन्हा त्याची प्रेयसी रीमाला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. तिथे पवनच्या वडिलांनी रीमा आणि भगेंद्रला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. यावर नातेवाइकांनी दोघांनी पवनची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला.

आरोपी एकमेकांशी सांकेतिक शब्दांतून बोलायचे -

त्यानंतर या दोघांविरुद्ध चिकसाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची चिकसाणा पोलीस ठाण्याने कसून चौकशी केली. तपासात धक्कादायक खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी भगेंद्र आणि रीमाला अटक केली. पवनच्या बहिणीने सांगितले की, भावाची हत्या केल्यानंतरही त्याची पत्नी रीमा चांगलीच जगत होती. जेणेकरून घरातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा संशय येऊ नये. पवनच्या वडिलांनी सांगितले की, रीमा आणि तिचा प्रियकर भागेंद्र एकमेकांशी कोड वर्डद्वारे बोलत होते. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime news, India, Murder news, Women extramarital affair