नवी दिल्ली, 09 जुलै : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात आता दिल्लीतील एम्स रुग्णालयात असं प्रकरण समोर आलं, ज्यामध्ये डॉक्टरांनी लक्षणं असणाऱ्या कोरोना संक्रमित रुग्णाची चार वेळा टेस्ट केली तरी ती नेगेटिव्ह (corona test) आली आणि पाचव्या टेस्टच्या वेळी त्या रुग्णाच्या शरीरात कोरोनाव्हायरसविरोधात अँटिबॉडीज तयार झाल्याचं दिसलं. या प्रकरणामुळे डॉक्टरही हैराण झालेत. 80 वर्षीय महिलेचं हे प्रकरण आहे. तिची प्रकृती खालावत होती आणि तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणंही दिसत होती. त्यामुळे सुरुवातीला तिची आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट करण्यात आली. या टेस्टचे चार रिपोर्ट नेगेटिव्ह आली. तर पाचव्यांदा या महिलेची अँटिबॉडी टेस्ट (ANTIBODY TEST) केली ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. म्हणजे तिला कोरोनाची लागण झाली होती. तर मग या महिलेचे पहिले चारही रिपोर्ट नेगेटिव्ह कसे आले. व्हायरस आपलं रूप बदलतो आहे की आपल्याला टेस्ट प्रक्रिया बदलण्याची गरज आहे, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले. काय आहे आरटी-पीसीआर टेस्ट? यामध्ये संक्रमित व्यक्तीचे नाक किंवा घशातील स्वॅबचे नमुने घेतले जातात. हे नमुने आणि व्हायरसच्या डीएनएची तुलना केली जाते. दोघांमध्येही समानता असेल तर त्या व्यक्तीला कोरोना आहे असं निदान केलं जातं. या तपासणीला चार ते सहा तासांचा अवधी लागू शकतो. हे वाचा - पहिल्यांदाच कोरोनाचं नवं रुप समोर, 4 वेळा टेस्ट करूनही रिपोर्ट निगेटिव्ह पण… दरम्यान या टेस्टमुळे कोरोनाचं निदान होईलच असं नाही, असं आधीच सांगण्यात आलं आहे. कारण घेतलेल्या नमुन्यांमध्ये व्हायरस असणं गरजेचं आहे आणि नमुन्यांमध्ये व्हायरस नसेल तर संक्रमित रुग्णाचा रिपोर्ट नेगेटिव्ह येण्याची शक्यता असते. मात्र डॉ. गुर्जर यांनी ज्या प्रकरणाचा उल्लेख केला त्यामध्ये सलग चार वेळा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. काय आहे अँटिबॉडी टेस्ट? अँटिबॉडी टेस्टमध्ये शरीरात अँटिबॉडी तयार झाल्यात की नाही हे तपासलं जातं. कोरोना संक्रमणानंतर शरीरात अँटिबॉडी तयार होऊ लागतात. यावेळी रक्ताचे नमुने घेतले जातात आणि त्यातील अँटिबॉडीज आहेत की नाही ते तपासलं जातं, जर अँटिबॉडीज असतील तर त्या व्यक्तीला कोरोना झालेला असल्याचं स्पष्ट होतं. हे वाचा - VIDEO - आधी उपचार मग म्युझिक; ड्युटीनंतर कोरोना रुग्णांसाठी नर्स वाजवते वायोलिन अँटिबॉडी टेस्टमध्ये वेळ खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळी रुग्णाच्या शरीरात पुरेशा प्रमाणात अँटिबॉडी तयार झालेल्या असतील तेव्हाच नमुने घेणं गरजेचं आहे जेणेकरून नमुन्यांमध्ये अँटिबॉडीज सापडतील. एखाद्या व्यक्तीला संक्रमण झाल्यानंतर त्याविरोधात शरीरात अँटिबॉडीज तयार होण्यासाठी संक्रमणातनंतर सहा ते सात दिवसांचा कालावधी लागतो. कारण सामान्यपणे याच कालावधीत अँटिबॉडी तयार होतात आणि सहा ते आठ आठवडे त्या तयार होत असतात. त्यामुळे नमुने घेताना ती व्यक्ती संक्रमित होऊन पाच ते सात दिवस झालेले असावे लागतात. दिल्लीतील या महिलेच्या प्रकरणात अँटिबॉडी अचूक ठरत असल्याचं दाखवतं मात्र प्रत्यक्षात तसं नाही. योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने नमुने घेतल्यानं तिची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असू शकते. अँटिबॉडी टेस्ट शरीरातील फक्त अँटिबॉडीजची माहिती देतात, या टेस्टमुळे शरीरात संक्रमण कधीपासून आहे हे समजत नाही. व्हायरस बदलतो आहे की टेस्टची प्रक्रिया बदलण्याची गरज? व्हायरस आपलं रूप बदलतो आहे का याबाबत आधीपासूनच संशोधन सुरू आहे. मात्र फक्त या एका घटनेवरून हा निष्कर्ष काढणं कठीण आहे, असं तज्ज्ञ म्हणालेत. शिवाय सध्या तरी टेस्टसाठी वापरलेलं तंत्रज्ञान, टेस्ट करण्याची प्रक्रिया आणि पद्धत योग्य परिणाम देत आहेत, त्यामुळे आता त्यामध्ये बदल होणंही कठीण आहे. हे वाचा - काय सांगता? मीट किंवा फ्रोजन चिकनवर 15 दिवस जिवंत राहातो कोरोना खरं तर टेस्टच्या आधारावर कोरोनावर उपचार नाही होऊ शकत. तसंही यावर अजून उपचार नाही. फक्त डॉक्टर रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ नये आणि सपोर्टिव्ह ट्रिटमेंटची कमतरता पडू नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. जेणेकरून रुग्णांचं शरीर व्हायरसशी लढेल आणि आजारावर मात करेल. त्यामुळे सध्या कोरोनासारखी लक्षणं दिसताच ती लक्षणं कमी करणं याकडेच लक्ष देणं गरजेचं आहे, जे या महिलेच्या बाबतीतही करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.