मुंबई, 09 जुलै: चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. प्लॅस्टिक किंवा तर वस्तूंवर किती वेळ कोरोनाचे विषाणू जिवंत राहतात याबाबत वारंवार चर्चा केली जाते मात्र चिकन किंवा फ्रोजन मीटवर किती काळासाठी हे विषाणू जिवंत राहतात माहीत आहे का? या संदर्भात काही तज्ज्ञांनी नुकताच एक अभ्यास केला असून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेत झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की ते जनावरांच्या त्वचेवर 4 दिवस विषाणू टिकू शकतात, तर फ्रीजमध्ये ठेवलेल्या डुक्कर त्वचेमध्ये ते 15 आठवडे जिवंत राहू शकतो. अन्नाचे उद्योग, मांस प्रक्रिया आणि रेफ्रिजरेटेड किंवा फ्रोजन मीट, चिकन करण्याच्या प्रक्रियेमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचा किंवा पसरण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे सतर्क राहाणं आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा- पहिल्यांदाच कोरोनाचं नवं रुप समोर, 4 वेळा टेस्ट करूनही रिपोर्ट निगेटिव्ह पण… संशोधन करणार्या युनायटेड स्टेट्स आर्मी मेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फेक्टीव्ह डिजीजच्या म्हणण्यानुसार फ्रोजन नॉनव्हेजमधून कोरोनाचे विषाणू पसरवू शकतात. संशोधक डॉ. डेव्हिड हर्बर्ट यांच्या मते, जर चाचणी घेतली गेली नाही तर मांसाहारातील पॅकिंग प्लॅन्ट्समधून कोरोना पसरण्याचा धोका आहे. अमेरिकेमध्ये मीट आणि फूड मार्केटमध्ये 300 कोरोनाचे रुग्ण सापडले होते. चीननंही मीट-चिकन मार्केटमधून कोरोना पसरत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. डुकाराचं मासं तज्ज्ञांनी फ्रीज केलं तर त्यावर त्यांना कोरोनाचे विषाणू वाढत असल्याचं लक्षात आलं. जवळपास 4 दिवस हा विषाणू मांसावर जिवंत राहात असल्याची माहिती समोर आली आहे. तर फ्रीजरमध्ये ठेवलेल्या मांसावर 15 दिवस कोरोना जिवंत राहातो आणि दुप्पट वेगानं पसरतो असाही दावा संशोधकांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.