Home /News /coronavirus-latest-news /

अजबच! ऑक्सिजनसाठी पिंपळाच्या झाडाखाली झोपले रुग्ण, प्रकृती स्थिर असल्याचा दावा

अजबच! ऑक्सिजनसाठी पिंपळाच्या झाडाखाली झोपले रुग्ण, प्रकृती स्थिर असल्याचा दावा

चार ते पाच जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी सिलेंडर मिळाला नाही, यानंतर त्यांना कोणीतरी असं सांगितलं, की पिंपळाचं झाड (Peepal Tree) चोवीस तास ऑक्सिजन देतं.

    नवी दिल्ली 01 मे : देशात कोरोना (Coronavirus in India) रुग्णांची संख्या वाढत असतानाच मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांचा (Health Facilities) अभाव जाणवत आहे. सध्याच्या काळात रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजन (Oxygen Shortage) मिळणंही कठीण झालं आहे. अशात आता एक अजब घटना समोर आली आहे. या घटनेत चार ते पाच जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी सिलेंडर मिळाला नाही, यानंतर त्यांना कोणीतरी असं सांगितलं, की पिंपळाचं झाड (Peepal Tree) चोवीस तास ऑक्सिजन देतं. यानंतर पाचही रुग्ण शाहजहांपुरमधील तिलहरच्या गुनगुन मॅरिज लॉन रोडवरील एक पिंपळाच्या झाडाखाली जाऊन झोपले. त्यांना तिथे गेल्यावर खरंच बरं वाटलं की नाही, हे माहिती नाही. मात्र, त्यांना पाहाण्यासाठी तिथे एकच गर्दी जमली. भारतरत्न लता मंगेशकर यांनी दिली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 7 लाखांची मदत तिलहरच्या मोहल्ला बहादुरगंजमधील काही कुटुंबातील लोक जवळपास मागील तीन दिवसांपासून फतेहगंज गैसराकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली रात्रंदिवस झोपून आहेत. त्यांची प्रकृती मागील अनेक दिवसांपासूवन खराब होती. हे सर्वजण रुग्णालयात गेले, मात्र त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र, कोरोनाची सर्व लक्षणं या लोकांमध्ये होती. रिपोर्ट निगेटिव्ह असल्यानं रुग्णालयानं दाखल करुन घेण्यासही नकार दिला आणि त्यांना घरी माघारी पाठवलं. मात्र, घरी त्यांची प्रकृती आणखीच खालावली आणि ऑक्सिजन सिलेंडरही कोठेच मिळाला नाही. यादरम्यान कोणीतरी त्यांना सल्ला दिला, की पिंपळाच्या झाडाखाली झोपल्यास भरपूर ऑक्सिजन मिळेल. यानंतर हे पाच लोकून पिंपळाच्या झाडाखाली जाऊन झोपले. घरात आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत होता, मात्र आता बरं वाटत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकले नाहीत कुटुंबीय, खाकी वर्दीने निभावला माणुसकीचा धर्म घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिलहरचे आमदार रोशनलालदेखील या झाडाखाली झोपलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी पोहोचले. रुग्णांना लवकरात लवकर रुग्णालयात उपचार मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरु केले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona patient, Oxygen supply, Tree

    पुढील बातम्या