Home /News /mumbai /

भारतरत्न लता मंगेशकर यांनी दिली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 7 लाखांची मदत

भारतरत्न लता मंगेशकर यांनी दिली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 7 लाखांची मदत

या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

    मुं पबई, 01 मे : महाराष्ट्राला कोरोनाचा (Maharashtra corona) विळखा बसला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र जीवाची बाजी लावून मदत करत आहे. राज्यातील कोरोना लढ्यात खंड पडू नये यासाठी अनेक दानशूर व्यक्ती मुख्यमंत्री सहायता निधीत (Chief Minister’s Relief Fund-COVID 19) मदत करत आहे. भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनीही 7 लाखांची मदत देऊ केली आहे. कोविड 19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कोविड 19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड 19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. प्रिया मराठेनं कोरोना रुग्णांना दिली प्रेरणा; Videoवर होतोय कौतुकाचा वर्षाव या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे. ...तर लशीचा तुटवडा निर्माण झाला नसता, अजित पवारांचा मोदी सरकारवर निशाणा दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या वेलफेअर ट्रस्टकडूनही मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देण्यात आली आहे. 1 कोटी रुपयांचा चेक सुपुर्द करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या वर्षभराचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीत दिले आहे. तसंच, काँग्रेसचे आमदार सुद्धा आपल्या दोन महिन्यांचे मानधन हे मुख्यमंत्री सहायता निधीत देणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे Chief Minister’s Relief Fund-COVID 19 Savings Bank Account number 39239591720 State Bank of India, Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023 Branch Code 00300 IFSC CODE- SBIN0000300 सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या