मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Delta Variant ची दहशत! फक्त एक कोरोना रुग्ण सापडताच संपूर्ण New Zealand Lockdown

Delta Variant ची दहशत! फक्त एक कोरोना रुग्ण सापडताच संपूर्ण New Zealand Lockdown

देशात फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या पहिल्या कम्युनिटी केसची नोंद झाली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे.

देशात फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या पहिल्या कम्युनिटी केसची नोंद झाली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे.

देशात फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या पहिल्या कम्युनिटी केसची नोंद झाली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Priya Lad

वेलिंग्टन, 17 ऑगस्ट : महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे (Delta plus) आतापर्यंत 76 रुग्ण सापडले आहेत. असं असलं कोरोनावर नियंत्रण पाहता काही प्रमाणात नियम शिथील करण्यात आले आहेत. पण दुसरीकडे मात्र न्यूझीलँडमध्ये (New Zealand)  आता फक्त एक नवा कोरोना रुग्ण सापडला  (New Zealand Corona case) आणि संपूर्ण देशात लॉकडाऊन (New Zealand Lockdown) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यूझीलँड हा तोच देश आहे, जिथं गेल्या वर्षी कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता आणि या देशाने कोरोनावर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवलं होतं. त्यानंतर या देशातील लॉकडाऊन उठवण्यात आला होता. पण आता याच देशात फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या पहिल्या कम्युनिटी केसची नोंद झाली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे आणि संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.

ऑकलँडमध्ये कोरोना रुग्ण सापडला आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार आरोग्य महासंचालक अॅश्ले ब्लूमफिल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ऑकलँडमधील 58 वर्षांची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. या व्यक्तीलने लस घेतलेली नाही. देशातील इतर भागात प्रवास केला होता. त्यामुळे सीमेशी याचा संबंध आहे.

हा अधिक संसर्गजन्य अशा डेल्टा कोरोनाचं प्रकरण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण अद्याप याचं जीनोम सिक्वेंसिंग होतं आहे, त्यामुळे स्पष्ट झालेलं नाही.

हे वाचा - राज्यात Delta Plus चा धोका वाढत असताना आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

पण खबरदारी म्हणून न्यूझीलंडच्या पंतप्रधान (New Zealand's Prime Minister) जेसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशात तीन दिवसांचा तर ऑकलँड आणि त्याच्या आजूपासूनच्या क्षेत्रात सात दिवसांसाठी लॉकडाऊन असेल. आज रात्रीपासूनच लॉकडाऊन लागू होणार आहे. वेलिंग्टनमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

लेव्हल चारचा हा लॉकडाऊन असेल. शाळा, सार्वजनिक ठिकाणं आणि ऑफिसही बंद राहतील. सुपरमार्केट, औषधांची दुकानं अशा अत्यावश्यक सेवाच सुरू असतील.  लोकांनी घरूनच काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गरज असल्यास घराबाहेर पडा आणि मास्कचा वापर करा असं आवाहन करण्यात आलं आहे.

हे वाचा - बापरे! 'या' देशात Corona च्या पाचव्या लाटेमुळे हाहाकार; दररोज 600 जणांचा मृत्यू

जेसिंडा अर्डर्न म्हणाल्या, "डेल्टा व्हेरिएंट असलेल्या देशांच्या यादीत आता शेवटी आहोत. इतर देशांकडून काय करायला आणि काय नाही हे आपण आता शिकण्याच्या स्थितीत आहोत. डेल्टाला गेमचेंजर म्हटलं जात आहे आणि तो आहे. याचा अर्थ आपल्याला पुन्हा संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी कठोर मेहनत घेण्याची गरज आहे. इतर ठिकाणी काय होत आहे, ते आपण पाहत आहोत. जर आपण अयशस्वी झालो तर मग आपण टॉपवर जाऊन. आपल्याकडे फक्त एकच संधी आहे"

First published:

Tags: Coronavirus, Delta virus, Lockdown, New zealand