मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोल्हापूरमध्ये शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे खळबळ, 120 विद्यार्थी क्वारंटाइन

कोल्हापूरमध्ये शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे खळबळ, 120 विद्यार्थी क्वारंटाइन

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर याठिकाणी घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर याठिकाणी घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर याठिकाणी घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

कोल्हापूर, 02 मार्च: जिल्ह्यातील जयसिंगपूर (Jaysinghpur in Kolhapur) शहरातून ही घटना समोर आली आहे. शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus Positive) निघाल्यामुळे अकरावी आणि बारावीचे वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत. शिवाय अन्य शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. एकूण 20 शिक्षक आणि 120 विद्यार्थ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. हे अहवाल येईपर्यंत क्वारंटाइन राहण्याच्या सूचना पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने दिल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे. शिवाय या विद्यार्थ्यांचे आणि इतर शिक्षकांचे कुटुंबीय देखील तणावात आहेत.

या शिक्षिका कोल्हापूरमध्येच राहतात. त्यांचे पती आणि त्या दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांनी कोरोना चाचणीसाठी स्वॅब पाठवल्यानंतर रविवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तत्पूर्वी त्यांनी शुक्रवारी आणि शनिवारी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले होते. त्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

(हे वाचा-Corona vaccine ची जादू; फक्त कोरोनाच नाही तर 'या' आजारांनाही देतेय टक्कर)

या घटनेनंतर इतर शिक्षकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर त्या दिवशी या शिक्षिकेच्या वर्गात उपस्थित असणाऱ्या अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कळवण्यात आले आहे. त्यांना क्वारंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी या विद्यार्थ्यांचे स्वॅब पाठवले जाणार आहेत. पालकांची देखील चाचणी होण्याची शक्यता आहे.

(हे वाचा-Covaxin की Covishield; तुम्हाला घेता येईल का तुमच्या पसंतीची कोरोना लस?)

दरम्यान अशीही माहिती समोर आली आहे की, या शिक्षिका पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्याध्यापकांनी ही बाब प्राथमिक आरोग्य केंद्राला वेळेत कळवली नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना चांगलेच धारेवर धरले आहे. सध्या महाराष्ट्रातून समोर येणारी कोरोनाची आकडेवारी भीतीदायक आहे. अशावेळी प्रत्येकाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona hotspot, Corona vaccine, Kolhapur