वर्षभर कोरोनाव्हायरसच्या भीतीच्या सावटात राहिलेल्या प्रत्येकाला या वर्षात कोरोना लशीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पण आता तर ही कोरोना लस फक्त कोरोनाव्हायरसपासूनच बचाव करत नाही तर इतर आजारांवरही फायदेशीर ठरत असल्याचं दिसून आलं आहे.
सध्या भारत 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना इतर आजार आहेत, त्यांना कोरोना लस दिली जाते आहे. दरम्यान याआधी जगभरात ज्या लोकांनी कोरोना लस घेतली त्यांचे इतर आजारही दूर झाले आहेत.
रिपोर्टनुसार कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तींचे इतर आजारही बरे झाले आहेत. कित्येक वर्षांपासून असलेल्या आरोग्याच्या समस्यांना नियंत्रित करण्यातही कोरोना लस प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे.
इंग्लंडमधील 72 वर्षांच्या जोआन यांच्या गुडघ्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर त्यांना इन्फेक्शन झालं. ज्यामुळे त्यांना खूप वेदना होत होत्याय सहा महिन्यांपूर्वी नीट चालूही शकत नव्हत्या. पण त्यांनी या महिन्यात अॅस्ट्राझेनेकाची कोरोना लस घेतली आणि लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्या.(प्रतीकात्मक फोटो)
एक दुर्मिळ आजार असलेल्या व्यक्तीनंही कोरोना लस घेतल्यानंतर आपण ठिक झाल्याचं सांगितलं.(प्रतीकात्मक फोटो)
एका व्यक्तीला खाजेची समस्या होती. त्याच्या हातापायाला खाज यायची. लस घेतल्यानंतर काही तासांतच त्याच्या हातापायांना खाजेमुळे झालेले निशाण गायब झाले. (प्रतीकात्मक फोटो)
एका महिलेला 25 वर्षांपासून चक्कर यायची. कोरोना लस घेतल्यानंतर चार दिवसांनी तिला चक्कर येणं बंद झालं. (प्रतीकात्मक फोटो)
एका महिलेनं सांगितलं, तिच्या नवऱ्याला स्लीप डिसॉर्डर होता. ज्यामुळे त्यांना नीट झोप लागायची नाही. पण लस घेतल्यानंतर 15 वर्षांनी ते पहिल्यांदाच शांत झोपले. (प्रतीकात्मक फोटो)
दरम्यान फक्त कोरोना लसच नाही तर याआधीदेखील काही लशींनी अशीच कमाल केली होती, असं आज तकच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.