• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • Ground Report: आरोग्य मंत्र्यांच्या जालन्यात कोरोना रुग्णांची लूट! HRCT साठी मोजावे लागतायंत दुप्पट पैसे

Ground Report: आरोग्य मंत्र्यांच्या जालन्यात कोरोना रुग्णांची लूट! HRCT साठी मोजावे लागतायंत दुप्पट पैसे

राज्यात कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णांमध्ये दिवसेदिवस वाढ होत आहे. याचवेळी मात्र कोविड उपचारासाठीच्या विविध चाचण्यांच्या नावावर रुग्णांची लूट केली जात आहे. आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या जालन्यात देखील हीच परिस्थिती आहे

  • Share this:
जालना, 09 मे: राज्यात एकीकडे कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णांमध्ये दिवसेदिवस वाढ होत असताना दुसरीकडे मात्र कोविड उपचारासाठीच्या विविध चाचण्यांच्या नावावर रुग्णांची लूट केली जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस येताहेत. आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या जालन्यात (Jalna Corona Updates) देखील हीच परिस्थिती आहे. न्युज 18 लोकमत ने केलेल्या ग्राउंड रियालिटी चेक रिपोर्टमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यात देखील खाजगी प्रयोगशाळा आणि दवाखान्यांमध्ये शासकीय दर पायदळी तुडवित एचआरसिटी टेस्टच्या नावावर रुग्णांची (Private Hospitals and Labs are charging Double for HRCT Test) सर्रास लूट सुरू असल्याचं दाहक वास्तव समोर आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आरोग्य सुविधांसाठीचे शासनाने दरनिश्चिती केली असून त्यापेक्षा अधिक दर लावणाऱ्या दवाखाने आणि प्रयोगशाळांवर पँडेमिक अॅक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्टनुसार कारवाई करण्याचा इशारा दिला. टोपे यांच्या म्हणण्यानुसार एचआरसिटी टेस्ट 2000 रुपये, प्लाजमा 5500 रुपये तर खाजगी आरटीपीसीआर टेस्टसाठी 500 रुपये दर ठरविण्यात आलाय. हे वाचा-होम आयसोलेशनमध्ये कुणी रहावं? काय काळजी घ्यावी? खासदार अमोल कोल्हेंनी दिलं उत्तर दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्याचा विचार करता येथे अद्याप प्लाजमा टेस्ट आणि खाजगी आरटीपीसीआर टेस्टची सुविधाच उपलब्ध झालेली नाहीये. शासकीय अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्टवरूनच जालन्यात कोरोनाचा निदान केला जातोय. परंतु, भीतीपोटी अनेक नागरिक त्याऐवजी खाजगी रुग्णालयात किंवा प्रयोगशाळेत जाऊन एचआरसिटी टेस्ट करून परस्पर निदान आणि उपचार करण्याला प्राधान्य देताहेत. अधिकार नसतानाही अनेक बीएएमएस आणि बीएचएमएस डॉकटर्स देखील 40 टक्केच्या कट प्रॅक्टिससाठी कोरोना संशयित रुग्णांना सर्रासपणे एचआरसिटी टेस्ट करण्याचे सल्ले देताहेत. ज्यामुळे जालन्यातील अनेक खाजगी कोविड सेंटर्स आणि प्रयोगशाळा चालक देखील या संधीचे सोने करण्यात कुठलीच कसर सोडत नाहीये. एचारसिटीचे शासकीय दर 2 हजार रुपये ठरविलेले असताना देखील  काही दिवसांपूर्वी पर्यंत प्रत्येक रुग्णांकडून एचआरसीटी कोविड टेस्टसाठी 4-4 हजार रुपये वसूलण्यात येत होते. आता देखील शहरी भागातील नागरिकांकडून 2500 रुपये तर ग्रामीण भागातील रुग्णांना 4 हजार रुपयांचा भुर्दंड ठोठावला जातोय. हे वाचा-Mother's Day 2021 : कोविड-19च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर मदर्सनी शेअर केले अनुभव News18 लोकमतने या घटनेचा पाठपुरावा केला असता जालना याठिकाणच्या विविध स्थळांवर अजब प्रकार पाहायला मिळाला. लोकांची लूट या विविध ठिकाणी सुरू आहे. स्थळ- श्रीकृष्णा इमाजिन सेंटर, भारतमाता मंदिर चौक  याठिकाणी आम्हाला एचआरसीटी टेस्टसाठी 2500 रुपयांची मागणी करण्यात आली. जेव्हा आम्ही जाब विचारला की बाहेर शासनाने तर फक्त 2 हजार रुपये दर ठरवलेत तर आमची सिटीस्कॅन मशीन 64 टेस्ला असल्याने जास्त पैसे घेतले जात असल्याचा दावा करण्यात आला. स्थळ - जालना डायग्नोस्टिक सेंटर, जिजाऊ प्रवेशद्वार चौक याठिकाणी सिटीस्कॅन सध्या बंद असून येथील मशीन गुरुगणेश मुथा हॉस्पिटल येथे असून तेथे जाऊन टेस्ट करण्यासाठी रेफरन्स लेटर देखील देण्यात आला. दरम्यान, दूरध्वनीवरून या प्रयोगशाळेतील डॉक्टराशी सम्पर्क साधला असता त्यांनी एचआरसीटी साठी 2500 रुपये खर्च सांगितला. स्थळ- गुरुगणेश मुथा हॉस्पिटल, सरोजनीदेवी रोड याठिकाणी दवाखान्याचा गेट बंद होता. दार ठोठावल्यानंतर एक महिला डॉक्टर/कर्मचारी गेटजवळ आल्या. त्यांनी आमच्याकडे रुग्णाबद्दल आणि डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन बद्दल चौकशी केली. आम्ही एचारसिटीच्या फिसबद्दल विचारलं असता सरांनी सांगितल्याप्रमाणे 2500 रुपये लागतील असं ती मोठ्या तोरर्यात म्हणाली. दरम्यान, फिस काही कमी नाही होणार का..? असं विचारल्यावर, 'आता तरी फक्त 2500 घेतोय अगोदर तर आम्ही 4 हजार रुपये घ्यायचो, असं ठणकावून सांगितलं. हे वाचा-लस मिळाली नाही, पण प्रेम मिळालं, लग्नानंतर जोडप्याने मानले राजेश टोपेंचे आभार एकंदरीत पाहता शासन कितीही नियम ठरवून द्या पण आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्यात देखील खाजगी रुग्णालय आणि प्रयोगशाळा चालकांकडून सर्व नियम पायदळी तुडवित गोरगरीब कोविड रुग्णांची सर्रास लूट करत असून जिल्हा शल्य चिकित्सक किंवा आरोग्य प्रशासनाचे याकडे सोयीस्कररित्या अर्थपूर्ण दुर्लक्ष सुरू असल्याचे स्पष्ट जाणवतंय.
Published by:Janhavi Bhatkar
First published: