• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • VIDEO: होम आयसोलेशनमध्ये रुग्ण आणि नातेवाईकांनी काळजी कशी घ्यावी? खासदार अमोल कोल्हेंनी दिली महत्त्वाची माहिती

VIDEO: होम आयसोलेशनमध्ये रुग्ण आणि नातेवाईकांनी काळजी कशी घ्यावी? खासदार अमोल कोल्हेंनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोना बाधित रुग्णाने होम आयसोलेशनमध्ये राहताना काय करावे आणि काय करु नये याबाबत डॉ अमोल कोल्हे यांनी माहिती दिली आहे

 • Share this:
  मुंबई, 9 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus 2nd wave) प्रभाव खूपच मोठा असल्याचं पहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे (Coronavirus spike) आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे आणि सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशा परिस्थितीत अनेक कोरोनाबाधित रुग्ण हे सध्या होम आयसोलेशनचा (Home isolation) पर्याय निवडत आहेत. मात्र, होम आयसोलेशन कोणी करावे आणि होम आयसोलेशनमध्ये असताना रुग्णाने (Covid patient) आणि त्याच्या कुटुंबाने काय काळजी घ्यावी हे जाणून घेणं तितकेच महत्वाचे आहे. याच संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी फेसबूकवर (MP Dr Amol Kolhe Facebook) एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्याच्या माध्यमातून होम आयसोलेशन संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. होम आयसोलेशनमध्ये हे टाळाच काहीवेळा आपल्या निदर्शनास येतं की, होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक बाहेर फिरतात आढळतात. ही गोष्ट टाळली पाहिजे. असे केल्याने रुग्णाच्या कुटुंबीयांसाठी आणि समाजातील इतरांसाठी रोगाचा प्रसार करणारी धोक्याची घंटा ठरू शकते. होम आयसोलेशन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे. होम आयसोलेशन कुणी करावे? ज्याच्या घरात रुग्णासाठी स्वतंत्र खोली, स्वतंत्र टॉयलेट किंवा संपूर्ण कुटुंब कोविड पॉझिटिव्ह असल्यास अशा नागरिकांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडायला हवा. जर एकच टॉयलेट असेल तर रुग्णाने टॉयलेट वापरल्यास त्यानंतर त्या टॉयलेटचं निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. ज्यांच्या घरी अशी स्वतंत्र व्यवस्था नसेल त्यांनी शासनाने तयार केलेल्या कोविड केअर सेंटरचा वापर करावा. वाचा: लस मिळाली नाही, पण प्रेम मिळालं, लग्नानंतर जोडप्याने मानले राजेश टोपेंचे आभार होम आयसोलेशनमध्ये ही काळजी घ्या होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाने सतत मास्क वापरावा. जेवताना किंवा झोपताना मास्क काढावा मात्र, त्या काळात रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय एकमेकांच्या संपर्कात नसावेत. जर खूपच आवश्यक असेल तर रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाने मास्क परिधान करुनच एकमेकांसोबत संपर्क साधावा आणि त्यांच्यात सहा फूटाचे अंतर असणे आवश्यक आहे. होम आयसोलेशनमध्ये असताना रुग्ण ज्या वस्तू वापरत असेल त्या सर्व वस्तू साबणाच्या पाण्याने धुतल्याशिवाय कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याचा वापर करु नये. ... तर कुटुंबातील सदस्यांची चाचणी करणं गरजेचं या कोरोनाच्या लाटेत संसर्ग हा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर इतर सदस्यांनी पाचव्या किंवा सातव्या दिवशी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेणं नक्कीच फायदेशीर ठरेल. होम आयसोलेशन कालावधी किती दिवसांचा? होम आयसोलेशनचा कालावधी हा किमान 10 दिवसांचा असावा. त्यानंतरही रुग्णाला कोरोनाची लक्षणे असल्यास तर ती लक्षणे नाहीशी होईपर्यंत होम आयसोलेशनचा कालावधी असावा. वाचा: 'Remdesivir जादा दरात विकत असेल तर मला मेसेज करा', पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी जारी केला Mobile Number बाहेरील व्यक्तींसोबत थेट संपर्क ठेवावा का? रुग्ण होम आयसोलेशनध्ये असताना कुटुंबातील इतर सदस्यांनी बाहेरील नागरिकांसोबत संपर्क टाळावा. जर खूपच आवश्यक असेल तर मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. औषधे कुठली घ्यावीत? होम आयसोलेशनमध्ये असताना डॉक्टरांच्या सतत संपर्कात असणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा नियमित वापर करणे आवश्यक आहे. वाचा: Corona काळात Dark chocolate खा; केंद्र सरकारने का दिला असा सल्ला? WhatsApp वर आलेली उपचार पद्धती योग्य आहे का? व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेल्या माहितीवर किंवा ओळखीच्या माणसाने दिलेल्या उपचारपद्धतीवर अवलंबून राहू नका. डॉक्टरांनी जी औषधे दिली आहेत त्याचा योग्य वापर करावा. आहार कसा असावा? होम आयसोलेशनमध्ये असताना रुग्णाने आपल्या आहार संतूलित ठेवावा. प्रथिन्यांचे प्रमाण अधिक असावे, व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण अधिक असावे यासाठी थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे. कोमठ पाण्याने गुळण्या कराव्यात, वाफ घ्यावी. जर होम आयसोलेशनमध्ये व्यवस्थित काळजी घेतली तर 97 ते 98 टक्के नागरिक पूर्णपणे बरे होतात. घाबरू नका, काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
  Published by:Sunil Desale
  First published: