मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

लस मिळाली नाही, पण प्रेम मिळालं, लग्नानंतर जोडप्याने मानले राजेश टोपेंचे आभार

लस मिळाली नाही, पण प्रेम मिळालं, लग्नानंतर जोडप्याने मानले राजेश टोपेंचे आभार

मुलीकडील लोकांनीही हा प्रस्ताव मंजूर करत, आपल्या मुलीचं लग्न त्या वऱ्हाडी म्हणून आलेल्या मुलाशी लावून दिलं.

मुलीकडील लोकांनीही हा प्रस्ताव मंजूर करत, आपल्या मुलीचं लग्न त्या वऱ्हाडी म्हणून आलेल्या मुलाशी लावून दिलं.

रांगेत तासंतास उभं राहूनही कोरोना लस मिळत नसल्याने अशा परिस्थितीत अनेकांनी संपात व्यक्त केला. असं असताना दुसरीकडे मात्र एका तरुणाने याच परिस्थितीत रांगेत उभं राहून लस न मिळूनही आनंद व्यक्त केल्याची बाब सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma

मुंबई, 8 मे : राज्यात 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील सर्व लोकांचं लसीकरण करण्यास सुरुवात झाली. पण लशींच्या तुडवड्यामुळे मात्र, अनेकांना लांबच-लांब रांगेत उभं राहून परत घरी परतावं लागलं. रांगेत तासंतास उभं राहूनही कोरोना लस मिळत नसल्याने अशा परिस्थितीत अनेकांनी संपात व्यक्त केला. असं असताना दुसरीकडे मात्र एका तरुणाने याच परिस्थितीत रांगेत उभं राहून लस न मिळूनही आनंद व्यक्त केल्याची बाब सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लसीकरणासाठी आलो आणि थेट लग्नचं जमल्याचं सांगत तरुणाने आनंद व्यक्त केला आहे. त्याने थेट मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचे यासाठी आभारही मानले असून हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

'लसीकरणाच्या चांगल्या उपक्रमामुळे युवापिढी कोरोनामुक्त तर होईलच, पण अनेकांचे संसारही मार्गी लागतील, त्यापैकीच मी एक असल्याचं' त्याने सांगितलं. 'रांगेत उभं राहून लस तर मिळाली नाहीच, पण माझं अनेक वर्ष रखडलेलं लग्न जुळल्याचा आनंद व्यक्त करत' त्याने मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचे पत्राद्वारे आभार मानले आहेत.

'लसीकरणासाठी रांगेत उभा होतो. काही वेळाने एक मुलगी मागे येऊन थांबली. बराच वेळ रांगेत उभं राहिल्यानंतर, कंटाळा आल्याने त्या मुलीने आणि मी गप्पा मारायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी लशींचा साठा संपल्याने, लसीकरणासाठी पुन्हा दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं.'

दुसऱ्या दिवशीही पुन्हा आमची भेट झाली आणि गप्पा सुरू झाल्या. आम्ही लग्न कसं करायचं याबाबत चर्चा करू लागलो, दुसऱ्या दिवशीही लस संपल्यानंतर पुन्हा, लस न घेताच घरी जावं लागलं. तिसऱ्या दिवशीही पुन्हा तिच गोष्ट घडली. सहाव्या दिवशी आमचं लग्न होतं, तरीही रांगेत उभं राहिलो. लस संपल्यानंतर विवाहस्थळी पोहोचलो. आम्ही दोघेही लसीकरणासाठी आल्याने घरच्या कोणीही आमच्यावर संशय घेतला नाही आणि आम्ही एकत्र वेळ घालवू शकलो. या रांगेमुळेच आमचं प्रेम जमलं, यशस्वीही झालं. पण आम्हाला अजूनही लस मिळाली नाही. त्यामुळे आता आई-बाबा होण्याआधी लस मिळावी अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली असून, त्याने लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus, Marriage