मुंबई, 31 मार्च : कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लक्षणं नाही दिसली तरी कोरोनाव्हायरस असू शकतो. अशावेळी तुम्हाला कोरोनाव्हायरस आहे की नाही हे कसं ओळखावं, अशा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. यानंतर याबाबत कुठूनतरी माहिती मिळवण्याचा प्रयत्न लोकं करतात. कोरोनाव्हायरसबाबत सोशल मीडियावर (social media) बऱ्याच अफवा आणि चुकीची माहिती, गैरसमज पसरवले जात आहेत. कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी लोकं याला बळी पडत आहेत. अशाच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांपैकी एक म्हणजे कोरोनाव्हायरसची घरच्या घरी सेल्फ टेस्ट (coronavirus self tets). किमान 10 सेकंद तुमचा श्वास रोखू धरा. जर तुमला हे जमलं तर तुम्हाला कोरोनाव्हायरस नाही. कोरोनाव्हायरसची घरच्या घरी करता येणारी ही सेल्फ टेस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. रिलेशनशिप इसेनशिअल रेडिओे या फेसबुक पेजवर अशी पोस्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये स्टँडफोर्ड हॉस्पिल बोर्डच्या मते, ‘जर तुम्ही न खोकता, शिंकता 10 सेकंद श्वास रोखून धरला तर तुम्हाला कोरोनाव्हायरस नाही, असं समजा’
कोरोनाव्हायरसच्या या सेल्फ टेस्टमध्ये कितपत तथ्य आहे, याचा पाठपुरावा न्यूज 18 लोकमतने केला. हे वाचा - चीनमध्ये 42 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा, 24 तास सुरू आहेत अंत्यसंस्कार या पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, कोरोनाव्हायरसची हे सेल्फ टेस्ट स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीनं सांगितल्याचं म्हटलं आहे. मात्र स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीने व्हायरल झालेली ही सूचना आपण दिली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. The Stanford University has also tweeted to clarify that the viral advisory was not issued by them.
Misinformation about COVID-19 symptoms and treatment falsely attributed to Stanford is circulating on social media and in email forwards. It is not from Stanford. Official information from Stanford is available at https://t.co/LlNXeyuejP.
— Stanford University (@Stanford) March 13, 2020
स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीने ट्विट करून स्पष्ट केलं आहे की, “स्टँडफोर्डच्या नावाने COVID-19 ची लक्षण आणि उपचाराबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. मात्र स्टँडफोर्डने अशी काहीही माहिती दिलेली नाही” हे वाचा - भारतातील Coronavirus बाबत नवी माहिती समोर, तज्ज्ञ म्हणाले… शिवाय भारत सरकारनेही सोशल मीडियावरील हा दावा खोडून काढला आहे. PIB has also debunked the claim.
पीआयबीवर करण्यात आलेल्या ट्विटनुसार, “कोरोनाव्हायरस असलेले बहुतेक तरुण रुग्ण 10 सेकंदापेक्षाही जास्त वेळ आपला श्वास रोखून धरू शकतात आणि बहुतेक वयस्कर लोकांना हे शक्य नाही”. त्यामुळे ही फेक माहिती आहे" हे वाचा - खळबळजनक! परदेशातील 10 जणांना मशिदीत ठेवलं लपून, पोलिसांनी घेतलं ताब्यात तर जागतिक आरोग्यसंघटनेच्या मते, खोकला न येता किंवा अस्वस्थ न वाटता 10 सेकंद श्वास रोखून धरणं शक्य असणं याचा अर्थ तुम्हाला कोरोनाव्हायरस किंवा फुफ्फुसाचा इतर आजार नाही, असं अजिबात नाही.
जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, “खोकला, ताप, थकवा ही कोरोनाव्हायरसची प्रमुख लक्षणं आहेत. काही लोकांमध्ये या आजाराची तीव्रता गंभीर असते. कोरोनाव्हायरस आहे की नाही याचं निदान करण्यासाठी प्रयोगशाळेत केलेली चाचणीच योग्य आहे. असं श्वास रोखून तुम्हाला कोरोनाव्हायरस आहे की नाही हे समजणार नाही. खरं तर असं करणं धोकादायक आहे” हे वाचा - कोरोनाविरोधात लढा! सुपर हिरोंनी स्वत:सह कुटुंबाला व्हायरसपासून कसं वाचवावं?