भारतातील Coronavirus बाबत नवी माहिती समोर, तज्ज्ञ म्हणाले...

भारतातील Coronavirus बाबत नवी माहिती समोर, तज्ज्ञ म्हणाले...

इटलीपेक्षा भारतातील (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) वेगळा आहे, असं पद्मभूषण डॉ. डी. नागेश्वर रेड्डी (Dr D Nageshwar Reddy) म्हणाले.

  • Share this:

हैदराबाद, 31 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. डी. नागेश्वर रेड्डी (Dr D Nageshwar Reddy) यांनी दिलासादायक अशी बातमी दिली आहे. ़COVID-19 ची प्रकरणं वाढत आहेत, मात्र यामुळे घाबरण्याची गरज नाही. भारत सहजरित्या हा लढा जिंकेल, असं त्यांनी म्हटलं.

पद्मभूषण डॉ. डी नागेश्वर रेड्डी एशियन इन्स्टिट्युट ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजीचे चेअरमन आहेत. त्यांनी कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाबाबत नवी माहिती दिली आहे.

हे वाचा - दिल्लीतील एका चुकीमुळे देशभरात खळबळ, मुंबईपासून-अंदमानपर्यंत पसरला कोरोना

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत डॉ. नागेश्वर रेड्डी म्हणाले, "कोरोना हा एक आरएनए व्हायरस आहे. तो वटवाघळापासून माणसांपर्यंत पसरला. मात्र जेव्हा हा व्हायरस इटली, अमेरिका आणि भारतात पसरला तेव्हा त्याचे जीनोटाइप्स वेगळे झाले असणार. पूर्ण व्हायरसची सीक्वेंसिंग 4 देशांमध्ये करण्यात आली आहे. पहिला अमेरिका, दुसरा इटली, तिसरा चीन आणि शेवटी भारत आहे"

"अभ्यासात असं दिसून आलं की इटलीपेक्षा भारतातील व्हायरसचे जीनोम वेगळे आहेत. भारतात आलेल्या कोरोनाव्हायरसच्या जीनोमचे स्पाइक सिंगल म्युटेशन असलेले आहेत. सिंगल म्युटेशन असलेला व्हायरस एक आठवड्यातच कमजोर होतो. त्यामुळे भारतासाठी कोरोनाविरोधातील लढा जिंकण जास्त कठीण नाही.", असं डॉ. रेड्डी यांनी सांगितलं.

डॉ. रेड्डी पुढे म्हणाले, "व्हायरस थ्री म्युटेशनवाले आहेत, जे घातक आहेत. शिवाय इटलीत व्हायरस इतक्या झपाट्याने पसरण्यास आणखी एक कारण म्हणजे हा जास्त वयोवृद्ध लोकं असलेला देश आहे. इथली बहुतेक लोकसंख्या 70 ते 80 वयापेक्षा जास्त आहे. शिवाय वाढत्या वयानुसार रोगप्रतिकारक शक्तीही कमी होत जाते. धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, ब्लडप्रेशर या गोष्टीही कारणीभूत आहेत. त्यामुळे इटलीतील मृतांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. तर भारत, अमेरिका आणि चीनमध्ये व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 2 टक्केच आहे"

हे वाचा - धक्कादायक! 24 तासात 61 हजार लोकांना झाला कोरोना तर 3719 जणांचा मृत्यू

भारतात जो कोरोनाव्हायरस पसरला आहे, तो जास्त घातक नाही, त्यामुळे मृतांची संख्याही कमी आहे आणि बहुतेक लोकं बरी होत आहेत. अशा परिस्थिती भारत हा लढा जरूर जिंकेल, असा विश्वास डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.

First published: March 31, 2020, 12:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading