घरातील कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. अगदी डोअरबेल वाजवतानाही अवश्य ती काळजी घ्या. उघड्या हाताने डोअरबेल वाजवू नका.चावी, पर्स, बॅग अशा तुमच्याजवळ ज्या काही वस्तू असतील, त्यांना इतर कुणी हात लावणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी ठेवा.
तुम्ही घातलेले कपडे थेट वॉशिंग मशीनमध्ये टाका किंवा वेगळ्या बॅगेत ठेवा. लहान मुलं या कपड्यांना हात लावणार नाही, याची खबरदारी घ्या.
हे सर्व करताना तुम्ही ग्लोव्ह्ज घातले तर उत्तमच आहे. काम झाल्यानंतर हे ग्लोव्हज काढून टाका आणि कुणाच्या हाती लागणार नाहीत, याची काळजी घ्या.