शिर्डी, 31 मार्च : कोरोनाच्या संकटाचा विळखा लक्षात घेता केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळता यावी म्हणून सरकारने हे पाऊल उचललं आहे. मात्र अशाताच नेवासा येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशातील 10 जणांना मशिदीमध्ये लपून ठेवल्याचं उघड झालं आहे.
परदेशातील 10 जण नेवासा येथील मशिदीत गेल्या आठ दिवसांपासून होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर नेवासा पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मरकस मस्जिदचे ट्रस्टी जुम्माखान पठाण , सलिम पठाण यांचा समावेश आहे. तसंच मशिदीत लपलेल्या परदेशी नागरिकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या जिबूती, बेनिन, डेकॉर्ट आणि घाना देशातील दहा जणांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्या सर्वांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.
चंद्रपूरमध्ये घडला होता असाच प्रकार
चंद्रपूरच्या एका मशिदी तब्बल 14 मौलवी गेल्या 22 दिवसांपासून लपून बसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर पोलिसांनी मशिदीतून 11 तुर्कस्तानी तर भारतातील इतर भागातील 3 अशा एकूण 14 मौलवींना ताब्यात घेतले.
भारतावर एकीकडे कोरोनाचं संकट घोंगावत असताना हे मौलवी चंद्रपूरमधील मशिदीत का लपून राहिले होते, असा प्रश्न निर्माण झाला. या सर्व मौलवींना ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र हे मौलवी चंद्रपूरमध्ये नेमकं लपले होते, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.