Home /News /videsh /

चीनमध्ये 42 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा, 24 तासांत हजारो मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार

चीनमध्ये 42 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा, 24 तासांत हजारो मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार

चीनने 3300 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र स्थानिकांनी हा दावा खोटा ठरवला आहे.

    वुहान, 31 मार्च : चीनमधील वुहानमधून कोरोनाव्हायरस जगभरात पसरला. मात्र चीनने कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याचा दावा केला आहे. मात्र ब्रिटीश वेबसाइट डेली मेलने या दाव्याचे खंडन केले आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार वुहानमधील स्थानिकांचे म्हणणे आहे की कोरोनाव्हायरसमुळे येथे 42 हजार 000 लोकांचा मृत्यू झाला. चीनने मात्र केवळ 3304 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे चीनच्या दाव्यापेक्षा हे दहा पट जास्त आहे. चिनी आकडेवारीनुसार सुमारे 81 हजार लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. 3304 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दररोज 500 अस्थी कलश मृतांच्या नातेवाईकांकडे वुहानच्या सात स्मशानभूमींमधून पाठवले जात आहेत. दररोज 3500 लोकांच्या अस्थी पाठवल्या जात आहे. या वृत्तानुसार हंकू, वूचांग आणि हणयांगमधील लोकांना सांगितले गेले आहे की त्यांना 5 एप्रिलपर्यंत त्यांच्या नातेवाईकांच्या अस्थी देण्यात येतील. याच दिवशी येथे किंग मिंग फेस्टिव्हल सुरू होणार आहे, या दरम्यान लोक आपल्या पूर्वजांच्या समाधीस भेट देतात. अशाप्रकारे, 12 दिवसांत 42 हजार अस्थी कलशांचे वितरण केले जाईल. वाचा-'कोरोनाचा तिसरा टप्पा धोकादायक, लॉकडाउनने थांबला नाही तर चीनच्या मार्गाने उपाय' काही अस्थी कलश आजही बेवारस हंकूमध्येच दोनवेळा 5000 अस्थी कलश देण्यात आले आहे. हुबेई प्रांतातील जिंगझो शहर येथील स्मशानभूमीतील काही कलश पडून आहे. मात्र त्यावर कोणीही हक्क सांगितला नाही आहे. कोरोनाव्हायरसमुळे चीनमध्ये अंत्यसंस्कारांवर बंदी घालण्यात आली होती. प्रशासनानेच कोरोनव्हायरसने मरण पावलेल्यांचे अंतिम संस्कार केले. ज्यांना संसर्ग झालेला आढळला होता त्यांना घरात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यापूर्वी एका वेबसाइटने उपग्रह फोटोंच्या आधारे दावा केला होता की वुहान आणि चोंगकिंग शहरातील आकाशात सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण अचानक वाढले आहे. व्हायरसमुळे ठार झालेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारामुळे हे झाले असावे. या वृत्ताद्वारे या दाव्याचीही पुष्टी केली जाते. वाचा-कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाच्या वृद्ध पत्नीचा पुढाकार! 24 तास सुरू आहे मृतदेह जाळण्याचे काम वुहान येथील रहिवासी झांग यांचे म्हणणे आहे की, सरकारी आकडेवारी योग्य नाही आहे. येथे मृतदेह जाळणे 24 तास केले जात आहे. हुबेई प्रांतातील एका व्यक्तीने सांगितले की, बरेच लोक घरांमध्ये मरण पावले. ते म्हणाले की एका महिन्यात 28 हजार लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या