मनोज शर्मा भोपाळ, 12 मे : सिस्टर शांता पवार एरवी Coronavirus शी लढताना बिलकुल डगमगत नाहीत. कित्येक तास उभं राहून, स्वतःच्या जिवाची बाजी लावून रुग्णसेवा करत असतात. पण 3 वर्षाच्या चिमुरडीचा फोन येतो तेव्हा मात्र त्यांच्या मनाचा बांध फुटतो. हा VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. International Nurses Day निमित्ताने अशा अनेक मातांना नमन आणि कडक सॅल्युट कराल. जागतिक परिचारिका दिनाच्या दिवशीच हा VIDEO सोशल मीडियावर फिरत आहे. मध्य प्रदेशातल्या मंदसौर इथल्या रुग्णालयातलं हे दृश्य मन हेलावून टाकणारं आणि आपल्यासाठी जिवाची बाजू लावून या विषाणूविरोधात लढणाऱ्या वीरांगनांचं वास्तव सांगणारं. शांता पवार या मंदसौरच्या रुग्णालयात नर्स म्हणून काम कतात. Coronvairus चा प्रसार मध्य प्रदेशातही वेगाने वाढतो आहे. त्यात शांता पवार या Covid वॉर्डात काम करणाऱ्या नर्स. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक पेशंटना हाताळावं लागतं. स्वतःला संसर्ग होऊ नये म्हणून जपावं लागतं आणि आपल्यामुळे घरातल्या इतरांना या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून घरीच जाणं टाळावं लागतं. शांता पवार या गेल्या 50 दिवसात घरी गेलेल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या 3 वर्षाच्या मुलीला 50 दिवसात प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. बोलणं होतं, ते फक्त व्हिडीओ कॉलवरून. तीच भेट. ही चिमुरडी आईला म्हणते, घरी ये ना तू… त्या वेळी कसंबसं सावरत ती माऊली समजावते. बाबा घ्यायला येतील, मी लवकरच येईन.. पण हे सांगून झाल्यावर स्वतःची समजूत मात्र काढू शकत नाही. तिच्या अश्रूंचा बांध फुटतो आणि फोन ठेवून ती त्या अश्रूंना वाट मोकळी करून देते.
या एका VIDEO मधून सध्याच्या परिस्थितीत परिचारिका रुग्णसेवेसाठी, आपल्यासाठी काय करत आहेत याचा अंदाज येतो. शांता पवार यांच्या या व्हिडीओतून या परिचारिकांचा कर्तव्यासाठी वैयक्तिक आयुष्यातला त्यात दिसतो. खिशात दमडी नाही; घर गाठण्यासाठी 8 दिवसांपासून हातगाडीवर सुरू होता मजुराचा प्रवास …घर मला खायला उठलं आहे, इंजिनिअर तरुणाने गळफास घेऊन संपवलं जीवन दिलासा की चिंता? कोरोनाच्या दहशतीत ‘या’ आजाराचे रुग्ण कमी झाले