जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / ...घर मला खायला उठलं आहे, नवी मुंबईत इंजिनिअर तरुणाने गळफास घेऊन संपवलं जीवन

...घर मला खायला उठलं आहे, नवी मुंबईत इंजिनिअर तरुणाने गळफास घेऊन संपवलं जीवन

...घर मला खायला उठलं आहे, नवी मुंबईत इंजिनिअर तरुणाने गळफास घेऊन संपवलं जीवन

‘फोनवर तरी किती बोलणार. जितकं जास्त फोनवर बोलायचो तितकी जास्त आठवण यायची आणि मग मी रडत बसायचो’

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी मुंबई, 12 मे : कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. परंतु, लॉकडाउनमुळे घरी अडकलेल्या एका इंजिनिअर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरामध्ये ही घटना घडली आहे. सूरज सुर्वे (वय 27) असं या मृत तरुणाचं नाव आहे. सूरज हा लॉकडाउन लागू झाल्यापासून एकटाच घरात राहत होता. तर त्याचे सर्व कुटुंबीय हे गावी राहत होते. कुटुंबीय गावी अडकल्यामुळे सूरजला गावी जाता आले नाही. त्यामुळे तो घरात लॉकडाउन संपण्याची वाट पाहत होता. पण घरात एकटाच राहत असल्याने जीव घुसमटत होता, त्यामुळे सूरज याने टोकाचे पाऊल उचलले आणि राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हेही वाचा -  चीनच्या शेजारी देशानं कोरोनाला हरवलं, लस किंवा औषध नाही तर ‘हे’ अस्त्र आलं कामी आत्महत्येपूर्वी सूरजने  सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये त्याने आपण घरात एकटेच राहत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आहे. ‘खूप दिवस झाले एकटं राहतोय या घरात. हे घर मला एकट्याला खायला उठले आहे. सगळ्यांची खूप आठवण येत आहे. आठवण आली की एकटा रडत बसतो. बाहेरून कितीही खूश दिसत असलो तरी आतून खूप खच्चून गेलो आहे. फोनवर तरी किती बोलणार. जितकं जास्त फोनवर बोलायचो तितकी जास्त आठवण यायची आणि मग मी रडत बसायचो. घरच्यांपासून किती दिवस दूर राहावं लागणार आहे हे माहिती नाही. त्यामुळे मी माझ्या इच्छेप्रमाणे आत्महत्या करत आहे.’  असं सूरजने आपल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट केलं आहे. हेही वाचा -  लॉकडाउनमधील ‘त्या’ घटनेची विश्वास नांगरे पाटलांकडून गंभीर दखल, अखेर… पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: sucide
  • First Published :
जाहिरात
जाहिरात