Home /News /national /

खिशात दमडी नाही; घर गाठण्यासाठी 8 दिवसांपासून हातगाडीवर सुरू होता मजुराचा जीवघेणा प्रवास

खिशात दमडी नाही; घर गाठण्यासाठी 8 दिवसांपासून हातगाडीवर सुरू होता मजुराचा जीवघेणा प्रवास

मुंबई आणि शहरातील इतर भागातून मोठ्या संख्येने नागरिक शक्य त्या परिस्थितीत त्यांचं गाव गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत

    भोपाळ, 12 मे : कोरोनाचा संकट (Coronavirus) आणि लॉकडाऊनमध्ये प्रत्येक जण स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या दोन महिन्यात अनेक मजूर बेरोजगार झाले आहेत. कामही बंद झाले आहे. घरात अन्न नाही आणि खिसा रिकामी आहे. त्रस्त मजूर शक्य त्या परिस्थितीत आपल्या गावी परतत आहेत. मात्र या कडकडीत उन्हात इतका मोठा पल्ला गाठणं किती अवघड असू शकतं याचा अंदाजही लावता येणं अशक्य आहे. शहरांमधून घरी परतणाऱ्या या प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची स्वतंत्र अशी कहाणी आहे. जेव्हा घरातील अन्न-धान्य संपलं आणि खिशात पैसे शिल्लक राहिले नाही तर कोणी काय करेल? अशा परिस्थितीत मजूर तेथून निघून जाणंचं योग्य असल्याचे समजतात. प्रवास लांब असला आणि जाण्यासाठी काही वाहन नसेल तर... एक भाजी विक्रेत्याने हातगाडीवरुन तब्बल 190 किमीचं अंतर पार केलं. यावेळी त्याच्यासोबत 12 वर्षांची मुलगी आणि पत्नी होती. इंदूर ते भोपाळपर्यंतचे अंतर गाडीने पार करायला तसे 4 तास लागतात. मात्र तो पूर्ण करण्यासाठी या भाजीविक्रेत्याला तब्बल 8 दिवस लागले. सुरेश कुमारची कहाणी... भोपाळमध्ये राहणारे सुरेश कुमार बंसलच्या घरात त्याची पत्नी आणि 12 वर्षांची मुलगी आहे. मूळचा भोपाळचा सुरेश इंदूरमध्ये  भाजी विक्रीचं काम करीत होता. मात्र कोरोनाच्या कहरामुळे कामावर परिणाम झाला. सुरेशने काही काळ वाट पाहिली. मात्र परिस्थिती सुधारत नसल्याने त्याने भोपाळला जाण्याचे ठरवले. पैसे नसल्याने त्याने भाजी विकणाऱ्या हातगाडीवरुन गावचा रस्ताचे चालू लागला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी व मुलगी होती. रस्त्यात स्थानिकांनी त्यांना जेवणं दिले. भोपाळ बॉर्डरवर पोलिसांनी त्याची विचारपूस केली. तेव्हा त्या हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चाचणी केली आणि त्याला त्याच्या घरापर्यंत सोडलं. संबंधित-दिलासा की चिंता? कोरोनाच्या दहशतीत 'या' आजाराचे रुग्ण कमी झाले
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या