नवी दिल्ली, 12 मे : कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. मात्र याच लॉकडाऊनमुळे हार्ट अटॅकसारख्या आजारांचे रुग्णही कमी झालेत. न्यूयॉर्कमधील डॉक्टरांच्या मते, कोरोना महासाथीची सुरुवात झाल्यानंतर हार्ट अटॅकची प्रकरणं जवळपास 70 टक्क्यांनी कमी झालीत. अमेरिका, भारत, स्पेन आणि चीनमध्येही हार्ट अटॅक रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कोरोनाच्या भीतीनं हार्ट अटॅकचे रुग्ण रुग्णालयात जाण्यास घाबरत असावेत, हे यामागील एक कारण असू शकेल असं म्हणत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.मात्र लॉकडाऊनमुळे काही चांगल्या सुधारणा झाल्यात आणि त्यामुळेही असं झालं असावं अशी शक्यताही काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे आणि असं असेल तर ही परिस्थिती खूपच दिलासादायक आहे.
कामासंंबधी तणाव कमी झाला
बहुतेक लोकं घरातून काम करत आहेत, त्यामुळे पुरेसा आरामही मिळतो. ऑफिसमधील गडबड, मिटिंग्स आणि ट्रॅफिकमध्ये कोंडी हे सर्व त्यांच्या वर्किंग डेचा भाग नाही. यामुळे हार्ट अटॅकला कारणीभूत ठरणारा तणाव आणि हाय ब्लड प्रेशरची कमी होण्यास मदत होते.
हे वाचा - धक्कादायक! आधी 75 दिवस आणि आता फक्त 2 दिवसांतच 10 हजार नवे Corona रुग्ण
myUpchar शी संबंधित असलेले डॉ. लक्ष्मीदत्ता शुक्ला यांनी सांगितल की, जेव्हा व्यक्ती तणावात असतो, तेव्हा तो जास्त खाऊ लागतो, धूम्रपान आणि मद्यपानही जास्त करतो. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. स्वत:ला तणावापासून दूर ठेवण्यासाठी तुम्हाला आवडणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या गोष्टीत मन रमवा.
कमी प्रदूषण
वायू प्रदूषणही हार्ट अटॅक येण्यामागचं एक कारण आहे. गाड्यांमधून निघणारा धूर आरोग्यासाठी चांगला नाही. कोरोना लॉकडाऊनमुळे प्रदूषण लक्षणीय प्रमाणात कमी झालं आहे. हार्ट अटॅकची प्रकरणं कमी होण्यात हेदेखील एक कारण असू शकतं.
आहारात सुधार
लॉकडाऊनमुळे घरात बनवलेलं ताजं अन्न खायला मिळतं आहे, शिवाय जेवणही वेळेत होतं आहे. जंक फूड, प्रोसेस्ड फूड आणि बाहेरील तळलेलं पदार्थ खाणं होत नाही. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
जीवनशैलीत बदल
जीवनशैलीत बदल करून हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. कामाच्या ताणामुळे लोकांनी जीवनशैलीत आवश्यक बदल करणं शक्य होत नव्हतं. मात्र आता लोकं घरात आहेत, त्यामुळे वेळ व्यतित करण्यासाठी योग, व्यायाम, मेडिटेशन करत आहेत. हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. यामुळए हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
हे वाचा - तुमची फक्त 'ही' एक सवय आजारांपासून वाचवेल, 50 टक्के इन्फेक्शनचा धोका टाळेल
माय उपचारशी संबंधित एम्सचे डॉ. नबी वली यांनी सांगितलं, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातील काही दिवस तरी कमीत कमी 30 मिनिटं व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायाम आवडत नसेल तर योगा आणि मेडिटेशन करा. वयाच्या मानाने उंची आणि वजनही योग्य असायला हवं, त्यामुळे तीही काळजी घ्या.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.