मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Explainer: अमेरिकेत ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ! हॉस्पिटल्सवर वाढता ताण, आकडेवारी काय सांगतेय?

Explainer: अमेरिकेत ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ! हॉस्पिटल्सवर वाढता ताण, आकडेवारी काय सांगतेय?

अमेरिकेत (USA) ओमिक्रॉनच्या (Omicron) संसर्गानं भीषण स्वरुप धारण केलं असून, दिवसाला लाखोंच्या संख्येनं रुग्णांची नोंद होत आहे. परिणामी आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला आहे.

अमेरिकेत (USA) ओमिक्रॉनच्या (Omicron) संसर्गानं भीषण स्वरुप धारण केलं असून, दिवसाला लाखोंच्या संख्येनं रुग्णांची नोंद होत आहे. परिणामी आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला आहे.

अमेरिकेत (USA) ओमिक्रॉनच्या (Omicron) संसर्गानं भीषण स्वरुप धारण केलं असून, दिवसाला लाखोंच्या संख्येनं रुग्णांची नोंद होत आहे. परिणामी आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला आहे.

वॉशिग्टंन, 13 जानेवारी : अमेरिकेत (USA) ओमिक्रॉनच्या (Omicron) संसर्गानं भीषण स्वरूप धारण केलं असून, दिवसाला लाखोंच्या संख्येनं रुग्ण आढळत आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही प्रचंड वाढ होत असल्यानं इथल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. या तिसऱ्या लाटेत (Third Wave) हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या (Hospitalization) रुग्ण संख्येने गेल्या हिवाळ्यातील रुग्ण संख्येचा उच्चांक मोडीत काढला आहे. यावरून ओमिक्रॉनच्या संसर्गानं इथली स्थिती किती धोकादायक केली आहे, याची सहज कल्पना येते.

यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार, रविवारपर्यंत, 1 लाख 42 हजार 388 नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गेल्या वर्षी 14 जानेवारी रोजी एका दिवसातील 1 लाख 42 हजार 315 या रुग्णसंख्येचा उच्चांकही यामुळे मोडीत निघाला आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येची सात दिवसांची सरासरी 1 लाख 32 हजार 86 इतकी आहे. दोन आठवड्यांपूर्वीच्या तुलनेत त्यात तब्बल 83 टक्के वाढ झाली आहे.

रुग्णालयावर अतिरिक्त ताण

ओमिक्रॉनच्या या लाटेने हॉस्पिटल्स (Hospitals) भरून वाहू लागली असून, आधीच डेल्टा विषाणूच्या लाटेतील ताणामुळे थकलेले आरोग्य कर्मचारी या नव्या लाटेने पूर्णतः खचून गेले आहेत. या लाटेत हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारीही (Medical Staff) झपाट्यानं बाधित होत आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज कमी भासत आहे. मात्र, त्यांना काम करता येत नसल्यानं आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. यामुळं अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात अडथळे येत आहेत.

कोरोनाचा प्रायव्हेट पार्टवरही परिणाम? तरुणाने सांगितला धक्कादायक अनुभव

रुग्णांमध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचे प्रमाण अधिक असून, 60 पेक्षा जास्त वयाच्या लोकांचे प्रमाण अद्याप गेल्या हिवाळ्यातील रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी आहे. इतर आजारांवरील उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांनाही कोरोनाची लागण होत असल्याचं चाचण्यांमध्ये दिसून येत आहे. यामुळंही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अर्थात, याबाबत ठोस आकडेवारी सांगणारा कोणताही डेटा उपलब्ध नाही.

कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये डेल्टाचा संसर्ग जास्त

अमेरिकेत गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 33 टक्के तर मृत्यूच्या (Death) संख्येत 40 टक्के वाढ झाली असल्याचं आजार नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राच्या (US Centre for Disease Control and Prevention) प्रमुखांनी म्हटलं आहे. या केंद्राच्या संचालक रोशेले वालेन्स्की यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही आठवड्यातच ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे अमेरिकेतील कोविड-19 रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल. एकूण रुग्णसंख्येत 90 टक्के रुग्ण हे ओमिक्रॉन बाधित (Omicron infected) आहेत. डिसेंबर अखेर ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं, त्यांनतर प्रचंड वेगानं वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे त्यानं डेल्टालाही (Delta) मागं टाकलं आहे. मात्र, इतर विषाणू प्रकारांपेक्षा ओमिक्रॉन कमी घातक असल्याचं तज्ञांचे मत आहे. सध्या कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये डेल्टाचा संसर्ग झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे, असं ही वालेन्स्की यांनी स्पष्ट केलं. ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे, पण आतापर्यंत झालेले मृत्यू हे डेल्टामुळे आहेत. ओमिक्रॉनमुळे मृत्यूचे प्रमाण वाढू शकते का, हे सिद्ध होण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल असंही त्यांनी नमूद केलं. ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या आगामी काळात परिस्थिती आणखी भयंकर होऊ शकते याचे संकेत देत असल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे.

मास्क घालताना ही चूक अजिबात करू नका; डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत पाहा

दक्षिण आफ्रिकेत लाट ओसरतेय?

दरम्यान, सर्वात आधी ओमिक्रॉन आढळलेल्या दक्षिण आफ्रिकेत (South Africa) सुरुवातीला रुग्णसंख्या वेगानं वाढली. मात्र, नंतर त्याच वेगानं कमी झाल्याचं आढळलं आहे. मात्र, मोठ्या रुग्ण संख्येमुळं गंभीर आजारी होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते असा इशारा तज्ञांनी दिला असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सनं म्हटलं आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी अनेकांना याचा त्रास होण्याची शक्यता आहे, असं काऊन्सील ऑफ स्टेटचे कार्यकारी संचालक जेनेट हॅमिल्टन यांनी म्हटलं आहे. तर यामुळं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ञांनी म्हटलं आहे.

हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तुलनेनं कमी

रुग्णसंख्येच्या (Cases) तुलनेत हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तुलनेनं कमी असलं तरी देशभरात सर्वत्र हॉस्पिटल्स, इमर्जन्सी रूम्स, अर्जंट केअर सेंटर्स आणि डॉक्टर्सची खासगी क्लिनिक्समध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. त्यामुळं आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. नॅशनल डेटामध्ये (National Deta) कोविड-19 साठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले रुग्ण आणि दुसऱ्या आजारासाठी दाखल झालेले परंतु ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे असे रुग्ण अशी वर्गवारी केली जात नाही. ओमिक्रॉनचा संसर्ग सहजपणे होऊ शकत असल्यानं अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काही हॉस्पिटल्सच्या मते निम्मे रुग्ण अशाप्रकारे बाधित झालेले आहेत, असं दक्षिण फ्लोरिडा युनिव्हर्सिटीचे संसर्गजन्य रोग तज्ञ जेसन. एल. सालेमी यांनी सांगितलं.

VIDEO : चीनचं 'झिरो कोविड' धोरण; लाखो लोकांना केलं मेटल बॉक्समध्ये क्वारंटाईन

दरम्यान, न्यूयॉर्क आणि सिएटलमधील रुग्णसंख्येची तुलना केल्यास असं आढळून आलं आहे की, लसीकरण (Vaccination) झालेल्या लोकांमध्ये ओमिक्रॉनच्या संसर्गानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागण्याचे आणि मृत्यूचा धोका असण्याचे प्रमाण लस न घेतलेल्या लोकांपेक्षा खूप कमी आहे.

First published:

Tags: America, Corona, Omicron, USA