Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Side Effect: कोरोनाचा प्रायव्हेट पार्टवरही परिणाम? तरुणाने सांगितला धक्कादायक अनुभव

Corona Side Effect: कोरोनाचा प्रायव्हेट पार्टवरही परिणाम? तरुणाने सांगितला धक्कादायक अनुभव

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पॉडकास्टवर आपली व्यथा सांगताना या व्यक्तीने दावा केला की कोरोनाबाधित झाल्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट लहान झाला आहे (Effect of Coronavirus on Private Part).

  • Published by:  Kiran Pharate

वॉशिंग्टन 13 जानेवारी : कोरोनाची वेगवेगळी लक्षणं (Symptoms of Coronavirus)आणि याचा परिणाम जवळपास सर्वांनाच माहिती आहेत. मागील दोन वर्षात याबद्दल इतकं वाचलं आणि ऐकलं आहे, की यातील बहुतेक गोष्टी अनेकांच्या लक्षात राहिल्या आहेत. मात्र, नुकतंच अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीने कोरोनाबाबत अतिशय अजब आणि चिंता वाढवणारा दावा केला आहे.

मिररच्या रिपोर्टनुसार, पॉडकास्टवर आपली व्यथा सांगताना या व्यक्तीने दावा केला की कोरोनाबाधित झाल्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट लहान झाला आहे (Effect of Coronavirus on Private Part). या व्यक्तीने म्हटलं, की माझं वय 30 वर्ष आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात मला कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर जेव्हा मी रुग्णालयातून घरी आलो, तेव्हा मी पाहिलं की माझा प्रायव्हेट पार्ट आधीच्या तुलनेत लहान झाला आहे. कोरोनातून बरं झाल्यानंतर मला इरेक्टाईल डिस्फंक्शन (Erectile Dysfunction) झालं होतं. जे काही औषधांवर बरं झालं, मात्र नवीन समस्या निर्माण करून गेलं.

Corona Alert : या लोकांसाठी Omicron व्हेरिएंट घातक; WHO ने दिला इशारा

या व्यक्तीने पुढे सांगितलं, की कोरोनाची लागण होण्याआधी माझ्या प्रायव्हेट पार्टची साईज नॉर्मल होती. मात्र आता आधीच्या तुलनेत ती कमी झाली आहे. कदाचित हे Vascular Damage मुळे झालं आहे आणि माझ्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ही समस्या आता कायम राहील. पॉडकास्टमध्ये बोलताना यूएस यूरोलॉजिस्ट एशले विंटर एमडी म्हणाले, की हे खरं आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शमुळे प्रायव्हेट पार्टचा आकार लहान होतो.

ते पुढे म्हणाले, की इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये तुम्ही अशा समस्येचा सामना करता, ज्यात प्रायव्हेट पार्ट स्वतःला स्ट्रेच करत नाही. एखाद्या व्यक्तीच्या मनात अशा काही भावना आल्यास त्याचा मेंदू प्रायव्हेट पार्टच्या नसांना तिथे रक्ताचा प्रवाह वाढवण्याता सिग्नल देतो. मात्र, जेव्हा असं नाही होत, तेव्हा ते स्ट्रेच होत नाही आणि याचाच परिणाम म्हणजे प्रायव्हेट पार्ट लहानच राहतो.

ओमिक्रॉनवर कोवॅक्सिन बुस्टर डोसचा नेमका काय परिणाम?; भारत बायोटेककडून मोठी अपडेट

या अमेरिकी व्यक्तीचं प्रकरण एक प्रकारचा पुरावा आहे, की कोरोनाचा संसर्ग व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टच्या रक्तप्रवाहापर्यंतही पोहोचू शकतो. डॉ. विंटर यांचं म्हणणं आहे, की हे कोरोनाचं एक अतिशय दुर्मिळ लक्षण आहे. जे प्रायव्हेट पार्टच्या रक्तप्रवाहाला प्रभावित करतं. हेच नंतर इरेक्टाइल डिस्फंक्शनचं कारण बनू शकतं. डॉ. विंटर यांनी यूरोलॉजिस्टच्या अभ्यासाच्या आधारे असं म्हटलं की कोरोनातून पूर्णपणे बरं झालेल्या दोन पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये व्हायरसचे ट्रेसेस आढळले, ज्यामुळे त्यांचं खासगी आयुष्य प्रभावित झालं. नंतर त्यांनी Implant Surgeries कराव्या लागल्या.

First published:

Tags: Coronavirus, PRIVATE part