नवी दिल्ली, 13 जानेवारी : मधल्या काळात अडगळीत निघालेला मास्क आता पुन्हा सर्वांना वापरावा लागत आहे. फेस मास्क (Face Mask) म्हणजे कोरोना विषाणूविरूद्ध मोठी ढाल आहे. कोरोनामुळे मास्कची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात मास्कच्या महत्त्वाबाबत वसंतकुंज फोर्टिस हॉस्पिटलच्या औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मनोज शर्मा सांगतात की, कोरोनाने पुन्हा एकदा दार ठोठावल्यानंतर आपल्या सर्वांना काही प्रतिबंधात्मक उपाय करण्याची (Corona And Mask) गरज आहे. योग्य मास्कच्या वापरासोबतच हँड सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग आणि सार्वजनिक ठिकाणी अनावश्यकरीत्या जाणं टाळण्याबाबतही चर्चा झाली. आता कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार असो, डेल्टा प्रकार असो किंवा भविष्यात येणारे नवीन प्रकार असोत, ते सर्व आपल्या नाकातून आणि तोंडातून शरीरात प्रवेश करतात. अशा परिस्थितीत, कोरोना विषाणूचा कोणताही प्रकार असो, त्याच्या संरक्षणासाठी आपल्याला या उपायांची मदत घ्यावी लागेल. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कपेक्षा चांगला पर्याय नाही. कोणत्या प्रकारे मास्क घालणे योग्य ठरेल डॉ. मनोज शर्मा यांच्या मते, कोरोना विषाणूमुळे श्वसनमार्गाला संसर्ग होतो. जेव्हा जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा विषाणू श्वसनमार्गांतील स्रावांसह वातावरणात प्रवेश करतो. अशा स्थितीत मास्क न लावता वावरल्यामुळे हा विषाणू आपल्या श्वासासोबत शरीरात प्रवेश करू शकतो. याशिवाय, जिथे खोकताना किंवा शिंकताना संक्रमित व्यक्तीच्या शरीरातून बाहेर उडालेला स्राव पडलेल्या ठिकाणी हाताने स्पर्श झाल्यास संसर्ग आपल्यापर्यंत पोहोचतो. संक्रमित हात आपल्या चेहऱ्याला लागला तर विषाणूची लागण होण्याची शक्यता असते. हे वाचा - उंदरांपासून विकसित झालाय कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट? चिनी संशोधकांच्या दाव्याने वाढवली चिंता संसर्ग टाळण्यासाठी जर आपण N-95 मास्क नीट घातला असेल आपण सुरक्षित आहोत, असं म्हणता येईल. मास्क नीट परिधान करणं म्हणजे आपलं तोंड आणि नाक चांगल्या प्रकारे झाकलेलं असणं. याशिवाय, मास्कला स्पर्श करण्याआधी हात सॅनिटायझरने स्वच्छ करणं किंवा हात साबणानं स्वच्छ धुणं आवश्यक आहे. जर तुम्ही मास्क योग्य पद्धतीनं लावला आणि हातांच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली, तर तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता नगण्य होते. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात कोणता मास्क सर्वात प्रभावी ठरेल विविध प्रकारचे कापडी, सर्जिकल आणि एन-95 मास्क बाजारात उपलब्ध आहेत. अलीकडील अभ्यासानुसार, सर्जिकल आणि कापडी मास्क 70 टक्के प्रभावी आहेत. वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, थ्री-प्लाय मास्क आणि फिटेड मास्क घालणं हा कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांत प्रभावी मार्ग आहे. कापडी आणि सर्जिकल मास्क धुतल्यानंतर त्यांचा प्रभाव कमी होतो आणि ते संक्रमणाची साखळी तोडण्यात अपयशी ठरतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.