मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

VIDEO : चीनचं 'झिरो कोविड' धोरण; लाखो लोकांना जबरदस्ती केलं मेटल बॉक्समध्ये क्वारंटाईन

VIDEO : चीनचं 'झिरो कोविड' धोरण; लाखो लोकांना जबरदस्ती केलं मेटल बॉक्समध्ये क्वारंटाईन

चीनने आपल्या जिरो कोविड पॉलिसी अंतर्गत आपल्या नागरिकांसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. लाखो लोकांना क्वारंटाईन केलं गेलं आहे. या लोकांना मेटल बॉक्समध्ये (Metal Box) राहण्यास भाग पाडलं जात आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 13 जानेवारी : भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार (Spread of Coronavirus) पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे नियम आणि निर्बंध आणले जात आहेत. यादरम्यान याचीही विशेष काळजी घेतली जात आहे, की या नियमांचं पालन करताना नागरिकांना काही समस्यांचा सामना करावा लागू नये. मात्र, अशात चीनने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जी पॉलिसी (Zero Covid Policy of China) आणली आहे ती तिथल्या नागरिकांसाठी चिंतेचं कारण ठरत आहे. Corona Alert : या लोकांसाठी Omicron व्हेरिएंट घातक; WHO ने दिला इशारा चीनने आपल्या जिरो कोविड पॉलिसी अंतर्गत आपल्या नागरिकांसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. लाखो लोकांना क्वारंटाईन केलं गेलं आहे. या लोकांना मेटल बॉक्समध्ये (Metal Box) राहण्यास भाग पाडलं जात आहे. बीजिंग पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकचं आयोजन करण्याची तयारी करत आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्धांना दोन आठवड्यांपर्यंत या बॉक्सेसमध्ये राहण्यास भाग पाडलं जात आहे. या लोकांच्या परिसरात एखादीही व्यक्ती कोरोनाबाधित आढळली, तरीही त्यांना हे सहन करावं लागत आहे. या बॉक्समध्येच लाकडी पलंग आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. असं सांगितलं जात आहे, की अनेक भागात मध्यरात्रीच लोकांना सांगण्यात आलं, की त्यांनी घरं सोडून क्वारंटाईन सेंटरमध्ये जावं. No Vax, Pay Tax! लस न घेणाऱ्यांकडून ‘या’ देशात आकारला जाणार कर अहवालानुसार, चीनमध्ये सुमारे 20 दशलक्ष लोक त्यांच्या घरात कैद आहेत आणि त्यांना अन्न खरेदी करण्यासाठीही घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कडक लॉकडाऊननंतर एका गर्भवती चिनी महिलेचा गर्भपात झाला. निर्बंधांमुळे तिला वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब झाला होता. तेव्हापासून चीनच्या झिरो कोविड धोरणावर वाद सुरू आहे. 2019 मध्ये पहिल्यांदाच चीनमध्ये कोरोनाव्हायरस आढळून आला होता.
First published:

Tags: Corona patient, Corona spread

पुढील बातम्या