सर्वसामान्यांना मोफत कोरोना लस देण्याबाबत निर्णय नाही; मोदी सरकारचा मोठा झटका

सर्वसामान्यांना मोफत कोरोना लस देण्याबाबत निर्णय नाही; मोदी सरकारचा मोठा झटका

50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं कोरोना लसीकरण (corona vaccination) मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : देशात सध्या कोरोना लसीकरण (Corona vaccination) मोहीम सुरू आहे. सरकारनं प्राधान्यक्रमानुसार लसीकरण मोहीम राबवत आहे. सर्वात आधी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि  50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे, त्यांना लस दिली जाणार आहे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना सध्या लस दिली जात आहे. आता तिसऱ्या गटातील नागरिकांचं लसीकरण मार्चपासून सुरू होणार आहे. या गटाला कोरोना लशीची प्रतीक्षा असताना आता मोदी सरकारनं मोठा झटका दिला आहे.

सध्या देशभरात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना मोफत कोरोना लस (free corona vaccine) दिली जाते आहे. मार्चपासून तिसऱ्या गटातील नागरिक म्हणजे 50 पेक्षा जास्त वयाच्या सर्वसामान्य व्यक्तींचं लसीकरण केलं जाणार आहे. पण या व्यक्तींना मोफत कोरोना लस देण्याबाबत कोणताही विचार झालेला नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - लवकरच दिला जाणार कोरोना लशीचा दुसरा डोस; पण पहिलाच शॉट घेतला नसेल तर काय?

नीती आयोगाचे सदस्य आणि राष्ट्रीय कोव्हिड टास्क फोर्सचे अध्यक्ष व्ही. के. पॉल यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, या वयाच्या व्यक्तींना मोफत लसीकरण करण्याबाबत अद्याप कोणता निर्णय झाला नाही. याबाबत राज्यांसह बैठक घेतली जाईल आणि चर्चा केली जाईल. आम्ही आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना मोफत लस देत आहोत. 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना मोफत लसीकरण आणि खर्चाबाबत राज्य आणि केंद्र सरकार बैठक घेईल.

हे वाचा - महाराष्ट्रातील या 3 शहरात वाढतो आहे कोरोनाचा धोका; सावध राहा आणि नियम पाळा

सध्या देशात 30 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहेत. त्यासाठी तीन गट तयार करण्यात आले आहेत. ज्यात एक कोटी आरोग्य कर्मचारी, दोन कोटी फ्रंटलाइन वर्कर्स आणि इतर 27 कोटी सर्वसामान्य नागरिक ज्यांच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि 50 पेक्षा जास्त वयाच्या नागरिक ज्याना कोरोनाचा धोका जास्त आहे, त्यांचा समावेश आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आहे ऑक्सफोर्डची लस

दरम्यान अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्डनं तयार केलेली लस ही 65 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी वापरता येऊ शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सांगितलं आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधात ही लस प्रभावी नाही असं सांगितलं जात होतं. पण डब्ल्यूएचओच्या  तज्ज्ञांनी याचा अभ्यास केला आणि जिथं कोरोनाचे नवे स्ट्रेन आढळून आले आहेत, तिथंदेखील ही लस प्रभावी आहे, असं सांगितलं आहे.

Published by: Priya Lad
First published: February 10, 2021, 10:27 PM IST

ताज्या बातम्या