खरंच मोदी सरकार 4000-6000 रुपयांना कोरोना लस विकतंय?

खरंच मोदी सरकार 4000-6000 रुपयांना कोरोना लस विकतंय?

सध्या देशभरात मोदी सरकारकडून मोफत कोरोना लसीकरण (corona vaccination) मोहीम राबवली जाते आहे. असं असताना सरकारी वेबसाईटवर कोरोना लसीकरणाची नोंदणी करून विकत कोरोना लस दिली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : सध्या देशभरात कोरोना लसीकरण (corona vaccination) मोहीम सुरू आहे. लसीकरणासाठी सरकारनं प्राधान्यक्रम ठरवला असून या लोकांना मोदी सरकार मोफत कोरोना लस (corona vaccine) दिली जाते आहे. असं असताना आता मोदी सरकार कोरोना लस (covid 19 vaccine) विकत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. सरकारी वेबसाईटवर कोरोना लसीकरणासाठी असा एक सेक्शन देण्यात आला आहे. जिथं नोंदणी केल्यास पैसे देऊन कोरोना लस घेता येईल. पण खरंच असं काही आहे का?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर ( Ministry of Health & Family Welfare ) कोरोना लशीची ऑफर देण्यात आली आहे. कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी एक सेक्शन देण्यात आलं आहे. जिथं 4000  ते  6000 रुपयांत कोरोना लशीच्या नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे.

mohfw.xyz अशी ही वेबसाईट आहे. यावर क्लिक केल्यावर Appointment for vaccination असं ऑप्शन दिसेल. जिथं खाली क्लिक करण्यासही सांगण्यात आलं आहे. यावर क्लिक केल्यानंतर दोन लशी लशी दिसतील. एक लस 4000 हजार रुपयांना तर दुसरी लस 6000 रुपयांना आहे.

हे वाचा - लवकरच दिला जाणार कोरोना लशीचा दुसरा डोस; पण पहिलाच शॉट घेतला नसेल तर काय?

खाली नाव आणि क्रमांक देऊन लशीचं बुकिंग करण्यासह सांगण्यात आलं आहे. शिवाय आणखी खाली पेमेंटचा ऑप्शनही देण्यात आला आहे. सोबतच खाली टीपमध्ये कोरोना लसीकरणाची तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जवळच्या रुग्णालयात लस घेण्याची सोय करून दिली जाईल. तसंच ग्राहक सेवा तुम्हाला संपर्क करेल त्याची प्रतीक्षा करावी, असंदेखील यामध्ये म्हटलं आहे.

तुम्हालादेखील अशाच काही वेबसाईटची लिंक आली आहे, असे काही मेसेज आले असतील. तर त्यावर विश्वास ठेवू नका. कारण ही बातमी चुकीची असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. mohfw.xyz अशी ही वेबसाईट आहे. जी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची असल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्यावर 4000-6000 रुपयांना लस ऑफर केली जाते आहे. ही वेबसाईट फेक आहे, असं पीआयबीनं सांगितलं आहे. PIB Fact Check कडून असं ट्वीट करण्यात आलं आहे.

हे वाचा - सर्वसामान्यांना मोफत कोरोना लस देण्याबाबत निर्णय नाही; मोदी सरकारचा मोठा झटका

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची अधिकृत वेबसाईट mohfw.gov.in अशी आहे. जिथं असा कोणताही मेसेज नाही. त्यामुळे कृपया फेक वेबसाईटवरील या आमिषाला बळी पडू नका.

Published by: Priya Lad
First published: February 11, 2021, 6:22 PM IST

ताज्या बातम्या