मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Omicron ला हलक्यात घेऊ नका! अमेरिका, ऑस्ट्रेलियात हॉस्पिटलमधल्या Corona रुग्णांची संख्या वाढली

Omicron ला हलक्यात घेऊ नका! अमेरिका, ऑस्ट्रेलियात हॉस्पिटलमधल्या Corona रुग्णांची संख्या वाढली

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Omicron या नव्या कोरोना विषाणूमुळे (Omicron variant coronavirus milder than delta) संसर्ग वेगाने होत असला तर अगदी हलकी लक्षणं (Mild symptoms) दिसतात, असं सांगितलं जात होतं. पण सध्या वेगळं चिंता वाढवणारं चित्र समोर येत आहे.

न्यूयॉर्क, 5 जानेवारी:  Omicron हा नवा विषाणू (new coronavirus variant omicron mild) सौम्य आहे आणि सर्दी, खोकला, बारिक ताप इतपतच लक्षणं दिसतात असं सांगणाऱ्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये कोविड रुग्ण संख्येचा (Covid Patient) उद्रेक झाला असून एका दिवसात वाढलेल्या संख्येनं आजवरचा जागतिक विक्रम (Global Record) नोंदवला आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे.

अमेरिकेत हॉस्पिटलायझेशनमध्ये 50 टक्के वाढ

या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेत (USA) 10 लाख रुग्ण आढळल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. गेल्या आठवड्यात त्यात 50 टक्के वाढ दिसून आली आहे. यात 59 टक्के रुग्ण ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग झालेले आहेत.

Coronavirus Update: 7 दिवस घरात आणि 3 दिवस ताप नको, नव्या Guidelines जारी

गेल्या वर्षीच्या हिवाळ्यापेक्षा यंदाच्या हिवाळ्यात (Winter)अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी अमेरिकेत 9 लाख 78 हजार 856 रुग्णांची नोंद झाली, तर मंगळवारी ही संख्या 5 लाख 70 हजारांच्या आसपास होती. कोविड रुग्णांच्या मृत्यूचा दर मात्र स्थिर आहे. अमेरिकेत मंगळवारी 1847 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आठवड्याभरात वाढलेली ही संख्या चिंताजनक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात 4 लाख 86 हजार रुग्णांची नोंद झाली होती.

ब्रिटन (Britain), फ्रान्समध्येही (France) रुग्णसंख्या वाऱ्याच्या वेगानं वाढत असून ब्रिटनमध्ये तब्बल 2 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये कोविड -19 रुग्णांच्या संख्येनं 2 लाखाचा टप्पा ओलांडला आहे.

डेल्टापेक्षा वेगळी आहेत Omicron ची लक्षणं आणि परिणाम; जाणून घ्या सविस्तर

यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी रुग्ण संख्या वाढत असल्यानं हॉस्पिटल्समधील कर्मचारी संख्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असल्यानं त्यात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचं जॉन्सन यांनी स्पष्ट केलं आहे.

फ्रान्समध्ये मंगळवारी 2 लाख 70 हजार नवीन रुग्ण आढळले. फ्रान्सचे पंतप्रधान इमान्यूएल मॅक्रॉन यांनी लस न घेतलेल्या लोकांनी तत्काळ लस घ्यावी असं आवाहन केलं आहे. सध्या इथं व्हॅक्सिन विधेयकावर राजकीय पक्षांची हमारीतुमरी सुरू आहे. या विधेयकानुसार लस न घेतलेल्या नागरिकांना रेल्वे, हॉटेल्स, कार्यक्रम अशा ठिकाणी प्रवेश मिळणार नाही, अशी तरतूद आहे.

कोरोनाचा IHU व्हेरियंट काय आहे? असे आणखी किती व्हेरिएंट येऊ शकतात?

ऑस्ट्रेलियातही (Australia)हेच चित्र आहे. दक्षिण हॅम्पशायरमध्ये रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. बुधवारी 61 हजार 109 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यन्तच्या रुग्ण संख्येचा हा विक्रम आहे. तिथं चाचणी करण्यासाठी लोकांची गर्दी वाढत आहे. तरीही चाचणी मोफत करण्याचं सरकारनं नाकारलं आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी लोकांनी आता कोरोनाच्या विषाणूसोबत जगणं शिकलं पाहिजे असं म्हटलं आहे, असं एएफपी वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे.

ब्राझिलमध्येही (Brazil)नवीन 18 हजार 759 रुग्णांची नोंद झाली असून, 181 जणांचा मृत्यू झाला आहे. तिथं कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची आतापर्यन्तची संख्या 22.32 दशलक्ष इतकी झाली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सरकारनं वार्षिक कार्निवल्स स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Australia, Coronavirus, Omicron, United States of America