जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Coronavirus Update : 7 दिवस घरात आणि 3 दिवस ताप नको, Home Isolation बाबत नव्या Guidelines; वाचा सविस्तर

Coronavirus Update : 7 दिवस घरात आणि 3 दिवस ताप नको, Home Isolation बाबत नव्या Guidelines; वाचा सविस्तर

Coronavirus Update : 7 दिवस घरात आणि 3 दिवस ताप नको, Home Isolation बाबत नव्या Guidelines; वाचा सविस्तर

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं होम आयसोलेशनबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जाणून घेऊया त्याचे तपशील…

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 जानेवारी: Omicron च्या वाढत्या फैलावाच्या (Corona wave) पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Health Department) नव्या मार्गदर्शक सूचना (New Guidelines issued) जारी केल्या आहेत. त्यानुसार ज्या नागरिकांची कोरोना टेस्ट (Covid Test) पॉझिटिव्ह (Positive) येईल आणि कुठलीही गंभीर लक्षणं नसतील, त्यांना सात दिवस होम आयसोलेशनचा (7 days home isolation) सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर पुढचे सलग तीन दिवस ताप (3 days without fever) आला नाही, तरच त्यांचं आयसोलेशन संपेल. अन्यथा आयसोलेशन कायम राहिल, असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.   दुसऱ्या टेस्टची गरज नाही सात दिवसांचं आयसोलशन संपून जर सलग तीन दिवस ताप आला नाही, तर पुन्हा कोरोना टेस्ट करण्याची गरज नसल्याचंही आरोग्य विभागनं स्पष्ट केलं आहे. सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 9 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या सहा पटीनं वाढली आहे. Omicron व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या तीन दिवसांत दुप्पट होत असल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून रुग्णालयं आणि इतर वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.   रुग्णालय सज्ज ठेवण्याच्या सूचना भारतात कोमॉर्बिडीज रुग्णांची म्हणजे कुठला ना कुठला गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांचं प्रमाण लक्षणीय आहे. यापैकी ज्या रुग्णांना कोरोनाची गंभीर लक्षणं आढळतील, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. त्यासाठी कंट्रोल रुम सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना अँब्युलन्स, टेस्टिंग आणि हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे यासारख्या सुविधा मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे.   असे आहेत नवे नियम

  1. कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आल्यास सात दिवस होम आयसोलेशन
  2. सलग तीन दिवस ताप आला नाही, तरच आयसोलेशन संपणार
  3. ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या परवानगीनेच होम आयसोलेशनची परवानगी
  4. होम आयसोलेशनसाठी घरात हवा खेळती असणं आवश्यक  
  5. रुग्णांनी ट्रिपल मास्क लावावा आणि जास्तीत जास्त पाणी प्यावं
  6. 93% पेक्षा अधिक ऑक्सिजन लेवल असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी
  7. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना जिल्हा स्तरावरील कंट्रोल रुमशी संपर्कात राहणं अत्यावश्यक
  8. सिटी स्कॅन आणि एक्स-रे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येणार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात