Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाचा IHU व्हेरियंट काय आहे? असे आणखी किती व्हेरिएंट येऊ शकतात?

कोरोनाचा IHU व्हेरियंट काय आहे? असे आणखी किती व्हेरिएंट येऊ शकतात?

Variant IHU

Variant IHU

कोविड-19 च्या (Covid-19) ओमिक्रॉन प्रकाराचा झपाट्याने प्रसार झाल्यानंतर आता फ्रान्समधून एक नवीन प्रकार (New Variant) समोर आला आहे. त्याबाबत अत्यंत संवेदनशीलतेने गांभीर्याने पाहिले जात आहे. प्राथमिक माहितीत काही चिंताजनक चिन्हे आहेत. मात्र, सध्यातरी सर्व प्रकारची खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संशोधकांनी त्याला IHU असे नाव दिले आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 जानेवारी : आता देशात कोविड-19 ची (Covid-19) तिसरी लाट आल्याचे मानले जात आहे. या लाटेत गेल्या महिन्यापासून पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा मोठा हात असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे. ओमिक्रॉन खूप वेगाने पसरत असून त्याच्या संसर्गाची लक्षणे देखील खूप वेगळी आहेत. अशा परिस्थितीत आता फ्रान्समध्ये SARS Cove-2 चा नवीन प्रकार (New Variant) तेथे संसर्ग पसरवत असल्याचे आढळून आले आहे. हा विषाणू देखील वेगाने पसरणारा प्रकार असून तज्ञांनी याबद्दल अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या B.1.640.2 किंवा IHU प्रकाराबद्दल आतापर्यंत काय माहिती आहे आणि तो किती धोकादायक ठरू शकतो? चला जाणून घेऊ. नवा व्हेरिएंट कुठे आढळला? दक्षिणपूर्व फ्रान्समधील 12 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या विश्लेषणानंतर हा नवीन B.1.640.2 प्रकार आढळून आला आहे. MedRive मध्ये प्रकाशित परंतु समीक्षण केले जात असलेल्या एका पेपरमध्ये, फ्रान्समधील IHU मेडिटेरेनी संसर्गाच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की या नवीन प्रकाराने संक्रमित रुग्णाची ओळख पटली आहे. हा रुग्ण कॅमेरूनच्या सहलीवरून फ्रान्सला परतला होता. सध्या तरी हेच नाव संशोधकांनी सध्या या प्रकाराला IHU असे नाव दिले असले तरी संशोधकांचा हा ग्रुप नाव देण्यास अधिकृत नाही. कोणत्याही नवीन प्रकाराला केवळ जागतिक आरोग्य संघटनेने नाव दिले आहे. एखादा विषाणू चिंतेचा विषय झाल्यानंतरच त्याच्या नामकरणाचा विचार केला जातो. किती म्यूटेशन? SARS Cov-2 विषाणू इतर संसर्गजन्य सूक्ष्मजंतूंप्रमाणे म्यूटेट होत राहतो, म्हणजेच तो सतत बदलत राहतो. आतापर्यंत या विषाणूचे अनेक म्यूटेशन झाले आहेत. मूळ व्हायरल स्ट्रेनच्या तुलनेत या नवीन प्रकारात संशोधकांनी किमान 46 म्यूटेशन आणि 37 डिलीशन (deletions) निरीक्षण केलं आहे. यामुळे 30 एमिनो ऍसिड विस्थापन आणि 12 डिलीशन झाले आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की SARS Cov-2 प्रकारांच्या डेटाचे हे आणखी एक उदाहरण आहे जे अनपेक्षितपणे समोर येणे आणि विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात मिळते. ओमिक्रॉनच्या संकटात मोठा दिलासा! हाच व्हेरिएंट करणार कोरोना महासाथीचा खात्मा म्यूटेशनची भूमिका जेव्हा विषाणू सेलच्या आत गुणाकार करतो किंवा स्वतःच्या अनेक प्रत बनवतो तेव्हा तो RNA ची एक प्रत देखील बनवतो, ज्यात अनेकदा गडबड होत आणि नवीन प्रत बदलते, याला म्यूटेशन म्हणतात. त्याच वेळी, विलोपन होताना काही तत्व सुटले जातात. व्हायरसमधील सर्व म्यूटेशन वाईट किंवा धोकादायक नसतात. पण काही त्याला पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक करतात. भीती नाही सावधगिरी संशोधकांचे म्हणणे आहे की या प्रकाराचा संसर्ग आरटी-पीसीआर चाचणीद्वारे सहजपणे ओळखला जाऊ शकतो. यासाठी संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग करण्याची गरज भासणार नाही जे वेळखाऊ आहे. अनेक तज्ञ म्हणतात की या प्रकारामुळे घाबरण्याचे काही नाही, परंतु, तपशीलवार माहिती येईपर्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनाही यावर बारीक लक्ष ठेवून आहे. लसीपासून वाचण्याची क्षमता जागतिक आरोग्य संघटनाही यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. या प्रकारावर त्यांची नजर ओमिक्रॉनच्याही आधी आहे. B.1.640 ज्याचा हा नवीन प्रकारचा वंशज आहे तो पहिल्यांदा घानामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सापडला होता. तेव्हापासून तो निरीक्षणाखाली आहे. त्याचे काही म्यूटेशन मागील 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' श्रेणी प्रकारांसारखेच आहेत. यामध्ये नैसर्गिक किंवा लस अंटीबॉडी टाळण्याची शरीराची क्षमता समाविष्ट आहे. भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 55 टक्क्यांनी वाढ, धडकी भरवणारी आकडेवारी हा प्रकार आता किती वेगाने पसरू शकतो याबद्दल अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. काही आठवड्यांत परिस्थिती स्पष्ट होईल. आतापर्यंतची माहिती फारशी भितीदायक नाही, पण काळजी घेण्याच्या सूचना देताना नक्कीच दिसत आहे. हा प्रकार Omicron पेक्षाही जुना आहे, तो देखील दिलासा देणारा ठरू शकतो.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Corona vaccination

    पुढील बातम्या