मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /COVID-19 Relief: कोरोना लसीकरण केंद्र आणि उपलब्ध स्लॉट शोधण्यात समस्या? हे 5 ऑनलाइन प्लॅटफॉर्म करतील मदत

COVID-19 Relief: कोरोना लसीकरण केंद्र आणि उपलब्ध स्लॉट शोधण्यात समस्या? हे 5 ऑनलाइन प्लॅटफॉर्म करतील मदत

कोरोना पेशंटला स्टेरॉईड  दिलं जात असेल तर, जास्त काळजी घ्यायला हवी.

कोरोना पेशंटला स्टेरॉईड दिलं जात असेल तर, जास्त काळजी घ्यायला हवी.

कोरोनाशी सामना करण्यासाठी सध्या आपल्यासमोर व्हॅक्सिन (Coronavirus Vaccine) हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे सरकारकडून नागरिकांना लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र लशींच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिकांचा खोळंबा होत आहे. अशावेळी हे प्लॅटफॉर्म तुमची मदत करतील

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 09 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave of Coronavirus) भारताची अधिक हानी झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे शिवाय मृतांची आकडेवारी देखील कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. दररोज साधारण 4 लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा दावा करतंय. मात्र अद्याप परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. शिवाय लशींचा तुटवडा, ऑक्सिजन-रेमडेसिव्हीरचा तुटवडा आणि काळाबाजार या समस्या आहेतच.

दरम्यान कोरोनाशी सामना करण्यासाठी सध्या आपल्यासमोर व्हॅक्सिन (Coronavirus Vaccine) हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे सरकारकडून नागरिकांना लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र लशींच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिकांचा खोळंबा होत आहे. अशावेळी काही टेक जायंट्स आणि स्वतंत्र संशोधकांनी पुढाकार घेत भारतीयांना जवळचे लसीकरण केंद्र (COVID-19 Vacine Center) आणि त्याठिकाणी लस घेण्यासाठी स्लॉट उपलब्ध आहे का हे शोधता यावे याकरता काही पर्याय शोधले आहेत. तुम्ही या पर्यायांचा वापर करून तुमच्या परिसरात कुठे लस शिल्लक आहे (these 5 Platforms Will Help You to Find Vaccine Centres With Available Slots) याचा सहजरित्या शोध लावू शकता. वाचा सविस्तर

हे वाचा-गोशाळेत उघडलं कोरोना सेंटर, रुग्णांना दिली जातायंत दूध-गोमुत्रापासून बनलेली औषधं

ही यादी जाणून घेण्याआधी हे समजून घेणं आवश्यक आहे की या प्लॅटफॉर्म्सवर केवळ तुम्हाला कोणत्या जवळच्या लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध आहे हे समजेल, लशीसाठी नोंदणी CoWIN portal वरच होईल. याकरता तुम्ही कोवीन अॅप किंवा वेबसाइटचा वापर करू शकता. शिवाय आरोग्यसेतू अ‍ॅपचा देखील वापर करता येईल

या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सची घ्या मदत

1. पेटीएम व्हॅक्सिन फायंडर (Paytm Vaccine Finder)- डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमने COVID-19 Paytm Vaccine Finder ची घोषणी केली आहे. इनबिल्ट असणाऱ्या मिनी अ‍ॅप स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही लशीची उपलब्धता तपासू शकता. याकता तुम्हाला Paytm App मध्ये जाऊन Mini App Store मध्ये जावं लागेल. त्याठिकाणी व्हॅक्सिन फायंडरचा पर्याय दिसेल, तिथे पिनकोड/जिल्ह्याचं नाव टाका. त्यानंतर 18+ ते 45+ हा वयोगट निवडून लशीची उपलब्धता तपासू शकता. जर लस उपलब्ध नसेल तर notify me when slots are available हा पर्याय निवडा. जेणेकरून लस उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला पेटीएमकडून अलर्ट मिळेल.

हे वाचा-Coronavirus:अनेक राज्यांत कोरोना रुग्णसंख्या घटली; मात्र मृतांचा आकडा वाढताच

2. व्हॅक्सिनेटमी (VaccinateMe)- हेल्दीफायमी या फिटनेस अ‍ॅपची एक सोपी टूल म्हणजे VaccinateMe. पिनकोड/जिल्ह्याचं नाव टाकून तुम्ही उपलब्ध स्लॉटबाबत माहिती मिळवू शकता. शिवाय सध्या स्लॉट उपलब्ध नसल्यास या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला संबंधित स्लॉट उपलब्ध झाल्यानंतर SMS, email, आणि WhatsApp च्या माध्यमातून अलर्ट दिला जाईल. यामध्ये वय, लस आणि इतर फिल्टर वापरता येतील

3. CoWIN- आधी नमुद केल्याप्रमाणे, युजर्सनी इतर कोणतंही अ‍ॅप्स किंवा वेबसाइट वापरली तरी, कोविड -19 ची लस घेण्यासाठीचा स्लॉट कोवीनच्या वेबसाइटवर आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी असणाऱ्या अ‍ॅपवर बुक करता येईल. या नोंदणीसाठी CoWIN हे एकमेव पोर्टल आहे. कोविन प्लॅटफॉर्म स्लॉटची उपलब्धता शोधण्याचा सर्वात पारंपारिक मार्ग प्रदान करतो, म्हणजेच पिन कोड वैयक्तिकरित्या प्रविष्ट करुन तुम्ही लशीची उपलब्धता तपासू शकता.

हे वाचा-मोठं मन! कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सासू-सूनेचे प्रयत्न; दागिने अन् पैसे दान

4. Getjab.in- या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला इमेलद्वारे माहिती मिळेल की, लशीचा स्लॉट उपलब्ध आहे की नाही. आयएसबीचे माजी विद्यार्थी असणाऱ्या श्याम सुंदर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. यातून माहिती मिळवण्याकरता तुम्हा नाव, इमेल, ठिकाण, पर्यायी फोन क्रमांक इत्यादी माहिती द्यावी लागेल.

5. WhatsApp MyGov कोरोना हेल्पडेस्क- मार्च 2020 मध्ये लाँच करण्यात आलेल्या WhatsApp MyGov Corona Helpdesk चॅटबॉटच्या साहाय्याने देखील तुम्हाला उपलब्ध लशींबाबत आणि लसीकरण केंद्राबाबत माहिती मिळू शकते. याकरता तुम्हाला 9013151515 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल. तुम्ही या चॅटबॉटचा वापर व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या साहाय्याने wa.me/919013151515 यावर क्लिक करून देखील करु शकता. चॅटबॉट हेल्पडेस्क उघडल्यानंतर युजरना hello असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर एक ऑटोमेटेड रिप्लाय येईल, त्यानंतर तुम्हाला कोव्हिड संबंधित समस्येचा पर्याय निवडावा लागेल. तुम्ही ही माहिती हिंदीमध्ये देखील मिळवू शकता.

First published:

Tags: Corona, Corona hotspot, Corona patient, Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine cost, Corona vaccine in market, Coronavirus