अहमदाबाद 09 मे: देशभरात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं (Second Wave of Coronavirus) थैमान घातलं आहे. या परिस्थितीमध्ये देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. अशात अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णालयात उपचार घेणंही शक्य होत नसल्याचं चित्र आहे. तर, काहींना ऑक्सिन (Oxygen) आणि रुग्णालयात बेड (Beds) मिळवण्याासठी भटकावं लागत आहे. या कठीण परिस्थितीमध्ये गरजू रुग्णांना आपल्याकडून थोडीफार मदत मिळावी या उद्देशानं गुजरातच्या राजकोट (Rajkot) येथील निर्मला दावडा आणि त्यांची सून खुशबू आकाश दावडा यांनी आपले सर्व पैसे, दागिने आणि ब्लँक चेक जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत. 15 दिवस मृत रुग्णाला जिवंत सांगत राहिले डॉक्टर, कारण समजताच हादरले कुटुंबीय राजकोटमध्ये राहाणाऱ्या निर्मला दावडा आणि खुशबू दावडा सामजिक कार्यासोबतच घरातील आपलं कर्तव्यही अगदी चोख पार पाडतात. छोटाशा घरात राहाणाऱ्या निर्मलाबेन आणि त्यांची सून खुशबू या शिवणकाम करतात. निर्मला या साडीला फॉल लावण्याचं तर त्यांची सून मास्क शिवण्याचं काम करते. मात्र, राजकोटमध्ये कोरोनाचा वाढता प्रसार आणि मृतांची वाढती संख्या पाहाता या सासू-सूनेनं आपल्याकडील सर्व जमलेले पैसे कोरोना रुग्णांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला. …अन् आई-भावानं डोळ्यादेखत सोडले प्राण; क्षणात हरपलं 3 वर्षाच्या मुलीचं विश्व या दोघींनी यातील काही पैशांनी सिलेंडर विकत घेतले तर उरलेल्या पैशांचा हिशोब करत ब्लँक चेक राजकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. निर्मला यांनी सांगितलं, की रुग्णांचे होणारे हाल त्यांना पाहावत नाहीत. यामुळे, आपले दागिनेही आपण दान करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या चांगल्या कामात त्यांची सून खुशबूही मागे नाही. खुशबूनं जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले दागिने देणार असल्याचं सांगितलं आहे. या दोघांचे हे प्रयत्न पाहाता त्यांना नारीरत्न पुरस्कार द्यायला हवा, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.