• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Coronavirus Second Wave: अनेक राज्यांत कोरोना रुग्णसंख्या घटली; मात्र मृतांचा आकडा वाढताच

Coronavirus Second Wave: अनेक राज्यांत कोरोना रुग्णसंख्या घटली; मात्र मृतांचा आकडा वाढताच

कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन, संचारबंदी असे उपाय योजले गेले असले तरी अद्यापही संसर्गावर नियंत्रण आल्याचे दिसत नाही. काही राज्यांमधील रुग्णसंख्या (Corona Patients) काहीशी घटली असली तरी मृतांची संख्या मात्र वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 09 मे: कोरोना महामारीमुळे देशातील परिस्थिती (Corona India Situation) अतिशय बिकट असून दररोज कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या (Corona death Count) वाढतच आहे. कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन, संचारबंदी असे उपाय योजले गेले असले तरी अद्यापही संसर्गावर नियंत्रण आल्याचे दिसत नाही. काही राज्यांमधील रुग्णसंख्या (Corona Patients) काहीशी घटली असली तरी मृतांची संख्या मात्र वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी 24 तासात चार लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशात 04,01,078 रुग्णांची नोंद झाली. याअगोदर पाच मे रोजी 4.12 लाख आणि 6 मे रोजी 4.14 लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मृतांची आकडेवारी वाढतच असून देशात गेल्या 24 तासात पहिल्यांदाच 4,187 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दिलासादायक बाब म्हणजे 03,18,609 रुग्ण कोरोनातून बरेही झाले आहेत. दिल्लीत संक्रमणाचे प्रमाण घटले राजधानी दिल्लीत कोरोना संसर्ग दर कमी झाला आहे. येथे संसर्ग होण्याचे प्रमाण 23.34 टक्के आहे. यापूर्वी 17 एप्रिल रोजी संसर्गाचे प्रमाण 24.56 टक्के होते. गेल्या 24 तासांत कोरोनाची 17364 नवीन प्रकरणे नोंदली गेली. परंतु गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 332 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या या आकडेवारीनुसार, राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 19 हजारांच्या पुढे गेली आहे. दिल्लीत अॅक्टीव रुग्णांची संख्या 87907 आहे. गेल्या 24 तासात नवीन 74384 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हे वाचा - काबुल हादरलं! शाळेजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मृतांचा आकडा 50 वर; लहान मुलांचाही समावेश मुंबईत कोरोनाचा वेग मंदावला सर्वाधित रुग्ण सापडत असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णसंख्येला चांगलाच ब्रेक लागला आहे. शहरातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजारांच्या खाली आली आहे. गेल्या 24 तासांत 33378 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कोरोनाचे नवे 2,678 रुग्ण सापडले असून सातत्याने रुग्णसंख्या कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय 3678 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 62 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 48484 सक्रिय रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 53 हजार 605 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 864 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 50 लाख 53 हजार 336 एवढी झाली आहे. तसेच आज 82 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 43 लाख 47 हजार 592 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंडची परिस्थिती बिकट गेल्या 24 तासात उत्तर प्रदेशात कोरोनाचे 26,847 नवीन रुग्ण सापडले आहेत. लखनौमध्ये सर्वाधिक 2179 नवीन बाधितांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या 24,5736 वर पोचली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनामुळे 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लखनौमध्ये, 38, कानपूरमध्ये 23 आणि झाशीमध्ये 18 मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 15170 पर्यंत वाढली आहे. हे वाचा - 15 दिवस कोरोना रुग्ण जिवंत असल्याचं डॉक्टरांनीच भासवलं, घटनेचं कारण समोर आल्यावर हादरले कुटुंबीय त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8390 नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर राज्यात संक्रमित लोकांची संख्या 238383 वर गेली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 71174 आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 118 लोकांचा मृत्यू झाला असून त्यानंतर राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या 3548 वर गेली आहे. गुजरातमध्ये कोरोनाची 11892 नवीन रुग्ण गुजरातमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 11892 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी 119 रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे. गेल्या 24 तासांत 14,737 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सक्रिय प्रकरणांची संख्या 143421 पर्यंत वाढली आहे. राज्यात सध्या 782 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: