अहमदाबाद, 09 मे: गुजरातमध्ये बनासकांठा जिल्ह्यात एका गोशाळेमध्ये कोविड केअर सेंटर (Corona care Center) सुरू करण्यात आले आहे. येथे रुग्णांचा आयुर्वेदिक औषधांनी (Ayurvedic Medicine) इलाज केला जात आहे. विशेष बाब ही आहे की, येथील औषधे गाईचे दूध (Cow Milk) आणि गोमुत्रापासून तयार केली जात आहेत. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची हलकी लक्षणे दिसत आहेत, अशाच रुग्णांवर येथे उपचार केले जात आहेत. या कोविड सेंटरला ‘वेदालक्षन पंचगव्य आयुर्वेद कोविड आयसोलेशन सेंटर’ असे नाव दिले गेले आहे. सध्या येथे 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. गोशाळेचे विश्वस्त मोहन जाधव यांनी अशी माहिती दिली आहे की, कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या रुग्णांना येथे भरती करण्यात आले आहे. ते म्हणाले की, आम्ही या सेंटरची सुरुवात पाच मे रोजी केली होती. तालुक्यातील एका गावातील सात रुग्णांना येथे दाखल करण्यात आले आहे. येथे आठ आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ही औषधे गाईचे दूध तूप आणि गोमूत्रापासून तयार केली गेली आहेत. हे वाचा - माणुसकीही विकून खाली, रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून विकले! पंचगव्य आयुर्वेदिक चिकित्सेचा उपयोग मोहन जाधव यांनी पुढे सांगितले की, येथे प्रामुख्याने कोविड-19ची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी पंचगव्य आयुर्वेद चिकित्सेचा उपयोग केला जात आहे. आम्ही ‘गो तीर्था’चे उपयोग करतो. ते देशी गाईंच्या मूत्रापासून आणि इतर आयुर्वेदिक वनौषधींचा वापर करून बनवले आहे. येथे खोकल्यावर उपचार केले जातात आणि आम्ही गोमूत्रावर आधारित औषधांचा वापर करतो. आमच्याकडे एक रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा च्यवनप्राश आहे. तो गाईच्या दुधापासून तयार केला जा तो. हे वाचा - Coronavirus Second Wave: अनेक राज्यांत कोरोना रुग्णसंख्या घटली; मात्र मृतांचा आकडा वाढताच मोफत होत आहेत उपचार या कोविड सेंटरवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी पैसे घेतले जात नाहीत. येथे 24 तास दोन आयुर्वेदिक डॉक्टर रुग्णांची देखभाल आणि उपचार करतात. याशिवाय, या सेंटरमध्ये एमबीबीएस डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे. ज्या रुग्णांना अॅलोपॅथिक औषधांची गरज पडत आहे, त्यांना त्याचेही डोस दिले जात आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच गुजरात सरकारने गावागावात कोविड सेंटर तयार करण्यास सांगितले होते. आतापर्यंत संपूर्ण राज्यात 10 हजारांहून अधिक कोविड सेंटर तयार करण्यात आले आहेत. या सेंटर्समध्ये जवळपास 1 लाख 20 हजार बेड आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.