मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनानं देशापुढे ठेवलेलं सर्वांत मोठं आव्हान; 26 कोटी मुलांचं शैक्षणिक नुकसान कसं भरून काढणार?

कोरोनानं देशापुढे ठेवलेलं सर्वांत मोठं आव्हान; 26 कोटी मुलांचं शैक्षणिक नुकसान कसं भरून काढणार?

शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष नियमावलीही जारी करण्यात आली आहे. या नियमांचं पालन करणं शाळांसाठी बंधनकारक असणार आहे.

शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष नियमावलीही जारी करण्यात आली आहे. या नियमांचं पालन करणं शाळांसाठी बंधनकारक असणार आहे.

कोरोनामुळे जवळपास 26 कोटी विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे. वर्षभरात झालेलं शैक्षणिक नुकसान वेळीच भरून नाही काढलं तर ही गॅप वाढत जाईल. शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

अनुराग बेहर

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी: कोरोनाच्या(Covid 19) संकटाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. मागील 10 महिन्यांपासून देशातल्या शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद आहेत. काही महिन्यांपासून शाळा ऑनलाईन (Online School) सुरू आहेत. त्याचबरोबर परीक्षा देखील ऑनलाईन होत आहेत.  शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विविध प्रयत्न करताना दिसून येत आहेत. शहरी भागांमध्ये शिक्षकांना सुविधा उपलब्ध असल्यानं त्यांना तितक्या मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत नाही. परंतु देशभरातील जवळपास 26 कोटी विद्यार्थ्यांना कोरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीचा फटका बसला आहे. कोरोनाच्या या काळात ऑनलाईन आणि मोहल्ला शाळांद्वारे विद्यार्थ्यांना शिकवलं जात होतं. पण यामध्ये विद्यार्थ्यांना किती समजतंय आणि विद्यार्थी नक्की शिक्षणाकडे लक्ष देत होते की नाही हा मोठा प्रश्न आहे.

खरं तर ऑनलाईन शिक्षण फारसं प्रभावी नाही. यामध्ये विद्यार्थी खरंच शिकण्याकडे लक्ष देत आहेत की नाही किंवा शिकवलेलं त्यांना कळतंय की नाही हे शिकवणाऱ्याला समजत नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा थेट संपर्क येत नसल्यानं त्यांचे विद्यार्थ्यांकडे हवं तितकं लक्षदेखील नसतं. त्यामुळे या सामाजिक अंतरामुळे या शिक्षण पद्धतीचा या कालावधीत विशेष फायदा झालेला दिसून येत नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या अकार्यक्षमतेच्या तपशिलात जाण्याचं हे ठिकाण नाही. परंतु या कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण पद्धतींमधील अनेक दोष समोर आले आहेत. यामुळेच अनेक राज्य सरकारांनी या ऑनलाईन वर्गाची अकार्यक्षमता ओळखून अनेक ठिकाणी मुक्त वर्ग भरवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकाच भागातील मुलं असल्यानं संसर्ग वाढण्याचा देखील धोका नव्हता. शिक्षकांनी देखील अशा पद्धतीनं एकत्र येत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं. यामध्ये कोरोनासंबंधी सर्व नियम पळून आणि कोणतीही अडचण नसताना देखील हे मोहल्ला वर्ग दररोज चार ते सहा तासांपेक्षा अधिक काळ भरवले जात होते. यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये भरवण्यात आलेल्या या मोहल्ला शाळेमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जोडण्याचं काम केलं. विद्यार्थी आणि शिक्षकांचा थेट संबंध आल्यानं शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास देखील मदत झाली.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट, आकडा 6 हजारांच्या पार; रिकव्हरी रेटही घसरला!

या वर्षभराच्या कालावधीत  घरी बसून अभ्यास करताना मुलं अनेक गोष्टी विसरली असल्याचं दिसून आलं आहे. मुलांमधील अभ्यासाच्या क्षमतेत घट आणि नवीन गोष्ट समजून घेण्याच्या क्षमतेत देखील घट झाल्याचं समोर आलं आहे. मार्च 2020 मध्ये शाळा बंद झाल्यानंतर त्या वर्गातील अभ्यास देखील मुलं विसरली असल्याचं या संशोधनात समोर आलं आहे. समजा मागच्या वर्षी मुलगा चौथ्या इयत्तेत शिकत होता तर आता तो त्या वर्षी काय शिकला होता हेदेखील विसरला आहे. याचबरोबर मुलांमधील अभ्यासाच्या क्षमतेत घट आणि नवीन गोष्ट समजून घेण्याच्या क्षमतेत देखील घट झाल्याचं समोर आलं आहे. समोर आलेल्या गोष्टीनुसार भाषा आणि गणित विषयांमध्ये मुलांनी सर्वात जास्त आपली क्षमता गमावली आहे. भाषा विषयामध्ये 92 टक्के आणि गणित विषयामध्ये 82 टक्के विद्यार्थ्यांनी आपलं एकतरी कौशल्य गमावलं असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे. यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षकांसमोर हे खूप मोठं संकट उभं राहणार आहे. शिक्षकांना यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार असून या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर भर देण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. या सर्व गोष्टी कव्हर करण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे.

अवश्य वाचा -     मुंबईत मोठा निर्णय: Home Quarantine बंद, कोरोना रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक

अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीने (Azim Premji University) बेंगळुरूमध्ये ‘‘Loss of Learning during the Pandemic’ या विषयावरील ग्राउंड रिपोर्ट प्रकाशित केला. यामध्ये भारतातील अनेक विद्यार्थ्यांना याचा फटका बसल्याचं समोर आलं आहे. जानेवारी 2021 मध्ये करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार 5 राज्यांमधील 44 जिल्ह्यांमधील 1137 शाळांमधील 16067 मुलांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये कोरोनाच्या काळात घरी बसून अभ्यास करताना मुलं अनेक गोष्टी विसरले असल्याचं दिसून आलं आहे. मुलांमधील अभ्यासाच्या क्षमतेत घट आणि नवीन गोष्टीचं आकलन करण्याच्या क्षमतेत देखील घट झाल्याचं समोर आलं आहे. या अभ्यासामध्ये समोर आलेल्या गोष्टीनुसार भाषा आणि गणित विषयांमध्ये मुलांनी सर्वांत जास्त आपली क्षमता गमावली आहे. भाषा विषयामध्ये 92 टक्के आणि गणित विषयामध्ये 82 टक्के विद्यार्थ्यांनी आपलं एकतरी कौशल्य गमावलं असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे.  अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या (Azim Premji University) 400 सदस्यांनी आणि 2 हजारांहून अधिक शिक्षकांनी मार्च 2021 ते जानेवारी 2021 या काळातील शैक्षणिक पातळीचं मूल्यांकन केलं. यामध्ये त्यांना ही गोष्ट आढळून आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची पॅराग्राफ वाचन करण्याची क्षमता कमी झाल्याचं देखील आढळून आलं आहे. कोरोनामुळं भारतासह सर्व जगाला फटका बसल्याचं म्हटलं आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातून हा मोठा तोटा असून शाळा सुरु झाल्यानंतर या मोठ्या संकटाला तोंड द्यावं  लागणार असल्याचं देखील म्हटलं आहे.

अवश्य वाचा -   मोठी बातमी! विदर्भात फुटला कोरोनाचा टाइम बॉम्ब, नागपुरात गेल्या 24 तासात 644 नवे रुग्ण

शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षकांनी हे आव्हान स्वीकारण्याची गरज आहे. शिक्षकांना यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार असून या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर भर देण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. या सर्व गोष्टी कव्हर करण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. यावर्षी शैक्षणिक वर्ष थोडंसं लांबवून वेळ घेऊन या गोष्टी नीट होऊ शकतात. शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई न करता विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. विशिष्ट वेळ घेऊन, विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेऊन हे आपण करू शकत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याची घाई न करता योग्य प्रकारचं शिक्षण, प्रशिक्षण आणि शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना यासाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. शिक्षकांनी यासाठी वेळ घेणं गरजेचं असून विविध प्रकारचं अभ्यासाचं मटेरियल आणि विविध मार्ग वापरून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

यामुळं या 26 कोटी मुलांच्या शिक्षणाकडं लक्ष न दिल्यास त्यांचा पाया कच्चा राहणार आहे. त्यामुळं या मुलांचं भवितव्य देखील अंधारात राहणार असल्यानं यावर विचार होणं गरजेचं आहे.

(लेखक अनुराग बेहर हे अझीम प्रेमजी फाउंडेशनचे CEO आणि अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आहेत.)

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Covid19, Education, School