मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत मोठा निर्णय: Home Quarantine बंद, कोरोना रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक

मुंबईत मोठा निर्णय: Home Quarantine बंद, कोरोना रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक

शनिवारी दिवसभरात 576 नवीन रुग्ण आढळून आलेत. शहरातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 2,63,052 एवढी झाली आहे.

शनिवारी दिवसभरात 576 नवीन रुग्ण आढळून आलेत. शहरातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 2,63,052 एवढी झाली आहे.

लक्षणविरहित कोरोना रुग्णांनासुद्धा (Asymptomatic covid patients) कोविड सेंटरमध्येच भरती व्हावं लागेल, असा मोठा निर्णय मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केला आहे.

  मुंबई, 19 फेब्रुवारी : महाराष्ट्रात पुन्हा एका कोरोनाचे रुग्ण (Covid-19 second wave in maharashtra) वाढू लागले आहेत. विदर्भात रुग्णवाढीचा वेग मोठा असला तरी गेल्या दोन-तीन दिवसांत मुंबईतचे रुग्णही वाढू लागले आहेत. याची दखल घेत मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी नवे नियम (New covid-19 rules mumbai) गुरुवारी जाहीर केले. त्यात भर घालत महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai mayor kishori pednekar) यांनी आज काही मोठे निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार इथून पुढे मुंबईत घरातलं विलगीकरण किंवा होम क्वारंटाइन (Home quarantine) बंद करण्यात आलं आहे.

  यापुढे लक्षण विरहित लोकांनासुद्धा होम क्वारंटाइन करणार नाही. प्रत्येकाला कोविड सेंटरमध्ये जावंच लागेल, असं महापौरांनी स्पष्ट केलं. सर्व सार्वजनिक कार्यक्रम आजपासून बंद करत असल्याचही महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केलं. लग्न समारंभात अनुमतीप्राप्त संख्येपेक्षा अधिक माणसं दिसली तर कारवाई होईल. कुणीही सोशल डिस्टन्सिंगचे किंवा मास्क वापरण्याचे नियम मोडले तर दंडात्मक कारवाई होईल, हे याअगोदरच मुंबईच्या आयुक्तांनी जाहीर केलं आहे.

  मुंबईचे आयुक्त इब्बालसिंग चहल यांनी दिलेल्या नियमांच्या यादीत वाढती रुग्‍ण संख्‍या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्‍या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत, असं म्हटलं होतं. पण त्यापुढे जात महापौरांनी पत्रकार परिषदेत मुंबईत होम क्वारंटाइन नाहीच, असं जाहीर केलं.

  मोठी बातमी! विदर्भात फुटला कोरोनाचा टाइम बॉम्ब, नागपुरात 24 तासात 644 नवे रुग्ण

  मुंबईत पाळावेच लागतील हे नियम

  - लग्‍न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱ्या आयोजकांसह व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल करावेत.

  - मास्‍कचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी उपनगरीय रेल्‍वे गाड्यांमध्‍ये 300 मार्शल्‍स नेमावेत तसेच मुंबईतील मार्शल्‍सची संख्‍या दुप्‍पट करावी.

  इथे वाचा सविस्तर - पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

  - पाचपेक्षा अधिक बाधित रुग्‍ण आढळणाऱया इमारती प्रतिबंधित (सील) कराव्‍यात, यासह विविध सक्‍त सूचना महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी केल्‍या आहेत.

  - ब्राझिलमधून मुंबईत येणारे प्रवासीदेखील आता संस्‍थात्‍मक विलगीकरणात

  - रुग्‍ण वाढत असलेल्‍या विभागांमध्‍ये तपासण्‍यांची संख्‍या वाढवणार

  First published:
  top videos

   Tags: Coronavirus, Covid cases, Home quarantine, India, Lockdown, Maharashtra, Mumbai