नागपूर, 19 फेब्रुवारी: महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान नुकतीच समोर आलेली नागपूरची आकडेवारी भयावह आहे.
नागपूरमध्ये गेल्या 24 तासात 644 रुग्ण आढळले असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 250 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या 5105 कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेस नागपूर मध्ये आहे. चिंतेचा विषय हा आहे की नागपूर मध्ये संक्रमण दर 12 टक्क्यांच्या घरात असून यामध्ये दिवसागणित झपाट्याने वाढ होत आहे.
दरम्यान कोरोना आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास लग्न सभागृह, दुकान आणि व्यापारी प्रतिष्ठान सील करण्याचे सक्त आदेश पालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहे मात्र नागपूरच्या रस्त्यावर नागरिक गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे.
(हे वाचा-कोरोनावर बाबा रामदेवांचा रामबाण उपाय, तीन दिवसात रुग्ण बरा होण्याचा दावा)
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी महाराष्ट्रात 5427 एवढे रेकॉर्ड ब्रेकिंग रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 4 डिसेंबरनंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. 4 डिसेंबरला पहिल्यांदा राज्यातील कोरोनाची दैनंदिन आकडेवारी 5 हजारांपेक्षा जास्त झाली होती. राज्यात आतापर्यंत 20 लाख 81 हजार 520 लोकांना कोराना झाला आहे. यापैकी 19 लाख 87 हजार 804 नागरिक बरे देखील झाले आहेत. तक 51 हजार 669 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आतापर्यंत 40 हजार 858 रुग्ण असे आहेत की ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून वाढतीच आहे. कोरोना रुग्णांचा हा ग्राफ वाढत असल्याने महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.
या जिल्ह्यांमध्ये निर्बंध
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शहरी व ग्रामीण भागाकरीता संचारबंदीचे आदेश पारीत केले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्हातही लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केली आहे.अमरावती जिल्हात रविवारी लॉकडाऊन पाळला जाणार आहे. हा लॉकडाऊन शनिवारी सायंकाळी रात्री आठ वाजल्यापासून सुरू होणार असून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona hotspot, Corona virus in india, Covid cases, Covid19, Maharashtra, Nagpur