जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Coronavirus Second Wave: कोरोनाची आकडेवारी भयंकर, अनेक देशांनी भारतातील प्रवास केला BAN

Coronavirus Second Wave: कोरोनाची आकडेवारी भयंकर, अनेक देशांनी भारतातील प्रवास केला BAN

Coronavirus Second Wave: कोरोनाची आकडेवारी भयंकर, अनेक देशांनी भारतातील प्रवास केला BAN

Coronavirus Update in India: येणाऱ्या काही दिवसात कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांमधून भारतात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. (travel banned to India from various countries)

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 एप्रिल:  कोरोनाची दुसरी लाट भारतामध्ये (Second Wave of Coronavirus in India) मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवणारी ठरत आहे. येणाऱ्या काही दिवसात कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांमधून भारतात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. (travel banned to India from various countries) यामध्ये प्रामुख्याने युएई, ऑस्ट्रेलिया, ओमान या देशांनी भारत प्रवास करण्यास बंदी घातली आहे. कॅनडाने भारतातून उड्डाण होणाऱ्या विमानांवर 30 दिवसांची बंदी लागू केली आहे. अशा अनेक देशांनी आपल्यावर प्रवासाची बंदी लागू केली आहे. अर्थात कोरोनाच्या उद्रेकामुळे अनेक देशात जाता येणार नाही आहे, तसंच त्या देशातून भारतातही येता येणार नाही आहे. कोणत्या देशांची आहे भारतातून येण्या/जाण्यास बंदी? पाकिस्तान, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, हाँगकाँग, सिंगापूर, ओमान, फ्रान्स, युएई, सौदी अरेबिया, कॅनडा इ. या देशांनी भारतात येण्यास किंवा भारतातून या देशांमध्ये जाण्यास बॅन लागू केला आहे. देशातील कोरोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता संबंधित देशांच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. म्युटेटेड कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या भीतीमुळे हाँगकाँग सरकारने 20 एप्रिलपासून 14 दिवसांसाठी भारतातून येणाजाणाऱ्या पॅसेंजर फ्लाइट्सवर बंदी आणली आहे. मुंबईतून हाँगकाँगमध्ये पोहोचलेले काही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानने देखील दोन आठवड्यासाठी भारतातील प्रवासासाठी बंदी आणली आहे. (हे वाचा- Bhandup Fire Exclusive:…तर त्या 11 जणांचे प्राण वाचले असते,आगीचं कारण आलं समोर ) ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी भारतातील दौरा रद्द केल्याच्या दुसऱ्याच दिवशी इंग्लंड सरकारने भारताला ‘रेड लिस्ट’ मध्ये टाकलं आहे. ब्रिटिश नागरिकांना भारतातून आल्यानंतर 11 दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार आहे, इतर लोकांना भारतातून इंग्लंडमध्ये येण्याची परवानगीच नाही आहे. एअर इंडियाने देखील भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या-येणाऱ्या फ्लाइट्स 24 ते 30 एप्रिल दरम्यान बंद केल्या आहेत. युनायटेड स्टेट्सच्या Centers for Disease Control and Prevention (CDC) देखील 20 एप्रिल रोजी नोटिफिकेशन जारी करत भारतातून प्रवास टाळण्यास सांगितले आहे. न्यूझीलंडमध्ये देखील भारतीय व्हेरिएंटच्या 17 केसेस आढळून आल्यानंतर प्रशासनाने भारतातील प्रवासावर बंदी आणली आहे. कॅनडाने देखील भारत आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी आणली आहे. याठिकाणी कार्गो फ्लाइट्स सुरू राहणार आहेत. सौदी अरेबियाने 20 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर देशात येण्याची बंदी आणली आहे, त्यात भारताचा समावेश आहे. युएईमध्ये देखील 24 एप्रिलपासून 10 दिवस भारतातून येणाऱ्या फ्लाइट्सवर बंदी आहे. (हे वाचा- सलग दुसऱ्या दिवशी देशात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; 10 दिवसांत 15000+ मृत्यू ) देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, कोरोना स्थिती भयावह बनत चालली आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोना विषाणूच्या आकडेवारीनं (Corona cases in India) विक्रमी झेप नोंदली आहे. गुरुवारी देशात 3.3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) सलग दुसऱ्यांदा कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखांपार गेला आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढताना दिसत आहे. त्यामुळे काही राज्यात कोरोना लॉकडाऊन (Corona Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. तर काही राज्य कोरोना लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशाला घरात बंद होण्याची वेळ येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात