जाहिरात
मराठी बातम्या / देश / Coronavirus: सलग दुसऱ्या दिवशी देशात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; 10 दिवसांत 15000+ मृत्यू

Coronavirus: सलग दुसऱ्या दिवशी देशात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; 10 दिवसांत 15000+ मृत्यू

Coronavirus: सलग दुसऱ्या दिवशी देशात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; 10 दिवसांत 15000+ मृत्यू

Coronavirus in India: गुरुवारी देशात 3.3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज सलग दुसऱ्यांदा कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखांपार गेला आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 एप्रिल: सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona pandemic) वेगाने होतं आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, कोरोना स्थिती भयावह बनत चालली आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोना विषाणूच्या आकडेवारीनं (Corona cases in India) विक्रमी झेप नोंदली आहे. गुरुवारी देशात 3.3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) सलग दुसऱ्यांदा कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखांपार गेला आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढताना दिसत आहे. त्यामुळे काही राज्यात कोरोना लॉकडाऊन (Corona Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. तर काही राज्य कोरोना लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशाला घरात बंद होण्याची वेळ येत आहे. देशात सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. असं असताना गेल्या 17  दिवसांपासून देशात दररोज एक लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या आढळत आहे. दुसरीकडे, देशात मृत्यू (Corona deaths in India) होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून दररोज 1 हजाराहून अधिक कोविड रुग्णांचा मृत्यू होतं आहे. गेल्या 10 दिवसांत 15 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यांची स्थिती महाराष्ट्रात कोरोना विषाणूची (Corona Cases in Maharashtra) स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. महाराष्ट्रात गुरुवारी 67,013 नवीन रुग्ण आढळली आहेत. महाराष्ट्रा पाठोपाठ उत्तर प्रदेशात 34 हजार 379, केरळमध्ये 26 हजार 995, दिल्लीत 26 हजार 169 आणि कर्नाटकात 25 हजार 795 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. छत्तीसगडमध्ये 16 हजार 750 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. तर राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि आंध्र प्रदेश याठिकाणीही 10 हजार ते 15 हजार दरम्यान कोरोना रुग्ण आढळत आहेत. हे ही वाचा- इम्युनिटी वाढवेल आणि व्हायरल इन्फेक्शनपासून ठेवेल दूर; आरोग्यासाठी उत्तम असा चहा महाराष्ट्रात गुरुवारी एकूण 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ऑक्सिजन बेडची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. बहुतांशी रुग्ण आरोग्याच्या सुविधा न मिळाल्यानं मृत्यूमुखी पडत आहेत. महाराष्ट्रासोबतचं देशाची राजधानी दिल्लीत 306 आणि छत्तीसगडमध्ये 207 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तर प्रदेशात 195, गुजरातमधील 137 आणि कर्नाटकमध्ये 123 रुग्णांचा बळी गेला आहे. या राज्यांव्यतिरिक्त पंजाब, मध्य प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल आणि हरियाणामध्ये 50 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात