ब्राझील 23 मे : सध्या संपूर्ण जगभरातच कोरोना (Corona) महामारीचा प्रकोप पाहायला मिळत आहे. वेगवेगळे देश आपल्या आपल्या पद्धतीनं कोरोनाविरोधातील लढाई लढत आहेत. अशात ब्राझीलमध्येही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. या नियमांचं पालन न करणाऱ्यांना शिक्षाही सुनावण्यात येत आहे. मात्र, तुम्ही या गोष्टीचा विचार करू शकता का, की कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे एका राष्ट्रपतीलाच दंड भरावा लागेल? मात्र, ब्राझीलमध्ये असं झालं आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात कोरोना नियमांचं पालन न केल्यानं ब्राझीलचे राष्ट्रपती (Violation of Covid Rules by President) जेअर बोलसोनारो (Jair Bolsonaro) यांनाही दंड भरावा लागणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना धोका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आखला नवा प्लॅन
मारान्होचे राज्यपाल फ्लेव्हिओ डिनो यांनी शुक्रवारी सांगितलं, की आरोग्यविषयक सुरक्षा नियमांचं पालन क केल्यानं बोलसोनारो यांना दंड भरावा लागणार आहे. कोणत्याही सुरक्षेशिवाय सभांचं आयोजन केल्याप्रकरणी आरोग्य अधिकाऱ्यांनी बोलसोनारो यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो.
लस घेतली आहे, कोरोना होऊन गेलाय तरी निश्चिंत होऊ नका! 100 दिवस काळजीचे
डिनो यांनी पुढे असंही म्हटलं, की त्यांच्या राज्यात शंभरहून अधिक लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही. तसंच मास्कचा वापरही अनिवार्य आहे. बोलसोनारो यांना उत्तर देण्यासाठी 15 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर दंडाची रक्कम निश्चित केली जाईल. एएफपीने या संस्थेनं बोलसोनारो यांच्या कार्यालयाकडे या प्रकरणाबाबत विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ब्राझीलमध्ये सध्या कोरोना स्थिती अत्यंत गंभीर आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णांचे सर्वाधिक बळी हे ब्राझीलमध्येच गेले आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, President, Rules violation