मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

लस घेतली आहे, कोरोना होऊन गेलाय तरी निश्चिंत होऊ नका! 100 दिवस काळजीचे

लस घेतली आहे, कोरोना होऊन गेलाय तरी निश्चिंत होऊ नका! 100 दिवस काळजीचे

कोरोनामधून बरं झाल्यानंतरही धोका कमी होत नाही. कोरोना पेशंट बरा झाल्यानंतर शरीरातल्या कमी झालेल्या प्लेटलेट्स अनेक आठवडे कमीच राहतात. व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स कमी होतात आणि काही आठवड्यांनी वाढतात देखील. मात्र कोरोनाच्या बाबतीत तसं नाहीये.

कोरोनामधून बरं झाल्यानंतरही धोका कमी होत नाही. कोरोना पेशंट बरा झाल्यानंतर शरीरातल्या कमी झालेल्या प्लेटलेट्स अनेक आठवडे कमीच राहतात. व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स कमी होतात आणि काही आठवड्यांनी वाढतात देखील. मात्र कोरोनाच्या बाबतीत तसं नाहीये.

कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) सध्या काहीशी धीमी होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. असं असलं तरीही अद्याप धोका टळलेला नाही. अशावेळी कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी देखील कोरोनाबाबत विशेष काळजी घेणं आवश्यक आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 23 मे: कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) सध्या काहीशी धीमी होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. असं असलं तरीही अद्याप धोका टळलेला नाही. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या सूत्रांचा वापर आपल्या दैंनंदिन जीवनात करणं अत्यंत आवश्यक आहे. लसीकरण (Vaccination) हा एकमेव पर्याय आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतो, त्यामुळे अधिकाधिक लोकांनी लस घेणे देखील आवश्यक आहे. दरम्यान जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांनी देखील खबरदारी बाळगणं आवश्यक आहे. आता पुन्हा आपल्याला कोरोना होणार नाही- अशी वर्तणूक एखाद्याला महागात पडू शकते. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाने निगेटिव्ह आल्यानंतर किमान 90 ते 100 दिवस काळजी घेणं महत्त्वाचं आहे. राज्य कोरोना कृती दलातील सदस्य डॉ. शशांक जोशी लोकसत्ता वृत्तपत्रात दिलेल्या लेखामध्ये अशाप्रकारे खबरदारी घेण्याबाबत सांगितलं आहे.

डॉ. शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातून बऱ्या झालेल्या कोणत्याच रुग्णाने गाफील राहता कामा नये. अगदी सौम्य लक्षणं असणाऱ्या किंवा गृह विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी देखील प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. सौम्य, मध्यम आणि तीव्र लक्षणं होती असणाऱ्या सर्वच रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना अनेक प्रकारचे त्रास होण्याची शक्यता यामध्ये त्यांनी वर्तवली आहे. याकरता संतुलित आहार, योग्य व्यायाम, विश्रांती आवश्यक असल्याचं ते म्हणाले. जरी एखादा रुग्ण कोरोनातून बरा झाला तरी त्याच्यामध्ये दीर्घकाळासाठी मरगळ, थकवा असतो; परदेशामध्ये त्याला लाँग कोव्हिड म्हटलं जातं. 99-100 पर्यंत ताप जाणं, हृदयाची धडधड वाढणं ही लक्षणं पोस्ट कोव्हिड देखील दिसतात. अशावेळी घाबरून न जाता तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

हे वाचा-Pune Vaccination: जाणून घ्या आज पुण्यात कसं आहे लसीकरणाचे नियोजन

यामध्ये त्यांनी रक्तदाब, मधूमेह असणाऱ्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. अशा रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणं आवश्यक आहे. स्टिरॉइडचा वापर कमी करणे, नियमित व्यायाम, श्वसनाचे व्यायाम इ. गोष्टींवर भर दिल्यास तुम्ही पोस्ट कोव्हिड परिस्थितीतून लवकर बाहेर पडू शकता.

कोरोना झाल्यानंतर स्वादुपिंडातील बीटा पेशी निकामी होऊन डायबेडिज होण्याचा धोका असतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

स्वच्छतेकडे दूर्लक्ष नको

दरम्यान कोरोनानंतर ब्लॅक फंगस हा आजारही डोकं वर काढत आहे. काळ्या बुरशीच्या आजाराविषयी एक नवीन माहिती आता उजेडात आली आहे. केवळ मधुमेहाचे (Diabetes) रुग्ण आणि जास्त स्टिरॉइड्स (Steroids) घेतलेल्या लोकांनाच हा आजार होतो असं नाही तर आणखी एक महत्त्वाचं कारण या आजाराच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहे आणि हे कारण आहे अस्वच्छता. ज्या कोरोना रूग्णांना उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड्स देण्यात आले आहेत, त्यांच्यात या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, असं या पूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. पण आता स्टिरॉइड्सच नव्हे तर स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा आजार वाढत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे वाचा-लहान मुलांसाठी भारतीय Nasal Vaccines ठरेल गेम चेंजर, WHOच्या शास्त्रज्ञांचा दावा

आरोग्य मंत्रालयाच्या मते आतापर्यंत देशात 28 लाख 5 हजार 399 अॅक्टिव्ह केसेस आहेत तर 2 कोटी 34 लाख 25 हजार रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 2 लाख 99 हजार 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाची आकडेवारी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. राज्यात शनिवारी कोरोनाचे 26,133 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 682 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या मते महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 55,53,225 लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. यापैकी 87,300  जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 40,294 रुग्ण बरे झाले आहेत. यानंतर ठीक झालेल्या रुग्णांची संख्या 51,11,095 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 3,52,247 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Corona updates, Corona vaccine, Coronavirus, Coronavirus cases