मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना धोका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आखला नवा प्लॅन

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना धोका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आखला नवा प्लॅन

'डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे , योग्य मार्गदर्शन करावे'

'डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे , योग्य मार्गदर्शन करावे'

'डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे , योग्य मार्गदर्शन करावे'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 23 मे : महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची तिसरी लाट (corona third wave ) येण्याची भीती वर्तवली जात आहे. पहिल्या लाटेत  ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, अशी चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी व्यक्त केली. तसंच,  कोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागले' असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्सच्या (maharashtra corona task force) राज्यातील बाल रोग तज्ञांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिल्या आहे.

'कोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत. त्यात पूर्ण यश नाही, पण रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येतेय. पण यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे. माझी टीम मजबूत व कुशल आहे' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सचं कौतुक केलं.

तेजस्विनीनं वाढदिवशी दिलं सरप्राईज; केली नव्या वाटचालीची मोठी घोषणा

'कोरोना विषाणूची जशी संसर्गाची साखळी असते तशी आपण आपली देखील एक घट्ट साखळी तयार करून, एकजुटीने या विषाणूचा मुकाबला करू. घाबरू नका, चिंता करू नका, आपल्या फॅमिली डॉक्टर , ज्याला मी “ माझा डॉक्टर” असे म्हणतो त्याला वेळीच मुलाला दाखवा म्हणजे उपचार लगेच सुरु करता येतील. माझे कुटुंब, माझी जबादारी मोहिमेची व्याप्ती वाढत चालली आहे' असंही मुख्यमंत्री म्हणाले.

'तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध राहिले पाहिजे. पहिल्या लाटेत  ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, अशी चिंता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

कोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागले, असंही मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं.

Pune Vaccination: जाणून घ्या आज पुण्यात कसं आहे लसीकरणाचे नियोजन

'गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. पण रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या.  डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे , योग्य मार्गदर्शन करावे', अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.

'कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही हे लक्षात घ्या. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला पण आपण आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पाउले टाकली आहेत. पुढील काळासाठी सुविधाही वाढवीत आहोत.

लसीकरणाच्या बाबतीतही मी परत सांगतो की, 18  ते 44 वयोगटातील वर्गासाठी 12 कोटी लसी एक रकमी घेण्याची आमची तयारी आहे पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे. आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत आणि मला झात्री आहे, जून नंतर लस पुरवठा सुरळीत सुरु होईल आणि आम्ही महाराष्ट्रातील  सर्व नागरिकांचे लसीकरण  वेगाने सुरू करू शकू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

First published: